नाकाबंदीत अडविल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांंसोबत हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:30+5:302021-05-18T04:10:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मोटारीतून पाच व्यक्तींना घेऊन जाणाऱ्याला नाकाबंदीत थांबवून चौकशी केल्याचा राग आल्यामुळे दोघांनी सहायक पोलीस ...

Fighting with police officers over obstruction in blockade | नाकाबंदीत अडविल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांंसोबत हुज्जत

नाकाबंदीत अडविल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांंसोबत हुज्जत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मोटारीतून पाच व्यक्तींना घेऊन जाणाऱ्याला नाकाबंदीत थांबवून चौकशी केल्याचा राग आल्यामुळे दोघांनी सहायक पोलीस निरीक्षकासोबत हुज्जत घातली.

याप्रकरणी खडक पोलिसांनी श्रीराम अशोकसिंग परदेशी (वय ३६), जतीन कुंदन परदेशी (वय २१, दोघे रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता फडतरे चौकात घडली. परदेशी हे एका कारमधून ५ जणांसह जात होते. फडतरे चौकात त्यांना विशेष पोलीस अधिकाऱ्याने अडविले. त्यांना थांबून घराबाहेर पडण्याचे कारण विचारले असता त्याने गोसावी यांच्यासोबत हुज्जत घालून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मी पत्रकार आहे. मी लॉ केले आहे. तुम्ही माझी गाडी अडवू शकत नाही, असे म्हणून तुम्ही कसली कारवाई करता, असे म्हणून तुमच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करतो, असे म्हणाला. गोसावी हे त्याला समजावून सांगत असताना जतीन परदेशी याने व्हिडिओ शुटिंग करण्यास सुरुवात केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करुन गर्दी जमवून पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचे विरुद्ध बोलून सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे अधिक तपास करीत आहेत़

Web Title: Fighting with police officers over obstruction in blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.