मारामारी; २६ पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Published: February 21, 2015 10:39 PM2015-02-21T22:39:43+5:302015-02-21T22:39:43+5:30

मांडवगण-फराटा हाणामारीप्रकरणी ५३ जणांवर प्राणघातक हल्ला व शासकीय कामात अडथळा आणला या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

Fights; Until the police closet up to 26 | मारामारी; २६ पर्यंत पोलीस कोठडी

मारामारी; २६ पर्यंत पोलीस कोठडी

Next

शिरूर : मांडवगण-फराटा हाणामारीप्रकरणी ५३ जणांवर प्राणघातक हल्ला व शासकीय कामात अडथळा आणला या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तेरा जणांना अटक करण्यात आली असून, आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कुस्ती आखाड्यात शेवटची कुस्ती लावण्यावरून झालेल्या हाणामारीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास गेलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला चढविला. यात सहायक फौजदार विठ्ठल रामभाऊ लडकत, पी.एम. बनकर, हवालदार एस.डी. कोलते, शिपाई एस.टी. कारंडे गंभीर जखमी झाले. याबाबत लडकत यांनीच फिर्याद दिली आहे.
भांडणे सोडवण्यास गेलेल्या या पोलिसांवर तलवार, हॉकीस्टिक, काठ्या व लाथा-बुक्क्याने हल्ला करण्यात आला.
लडकत, कारंडे यांच्या डोक्यात तलवारीचे वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. कोलते व बनकर हे देखील जखमी झाले.
बाळासाहेब कोळपेसह भानुदास कोळपे, दादासाहेब सुदाम कोळपे, रामभाऊ थोरात, बबन कोळपे, सिदा शेंडगे, बापू वाघमोडे, बाळू कारंडे, दादासो. कोकरे, गणेश
टेंगळे, दादा सगाजी कोळपे
व भाऊसाहेब येळे यांना
अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)

४अमोल फराटे, सुधीर फराटे, बाळासाहेब फराटे व ज्ञानेश्वर तावरे हेदेखील या जमावाचे शिकार बनले. त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर या जमावाने ग्रामपंचायतीची पाणी शुद्धीकरण यंत्रणेची तोडफोड केली. तसेच राहुल तावरे व राहुल फराटे यांच्या आॅफिसचीही तोडफोड केली. त्यानंतर हे सर्वजण हातात तलवारी, काठ्या व हॉकीस्टिक घेऊन गावात दहशत माजवताना पाहिल्याचे लडकत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Fights; Until the police closet up to 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.