वसंत मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची मागणी

By अजित घस्ते | Published: July 16, 2024 06:28 PM2024-07-16T18:28:20+5:302024-07-16T18:28:52+5:30

वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी सोशल मीडियावर अश्लील कमेंट करतात

File a case against Vasant More Demand of MNS workers in Pune | वसंत मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची मागणी

वसंत मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची मागणी

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी १० जुलै रोजी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा संदर्भात एक पोस्ट केली होती. सदर पोस्ट वर अनेक कमेंट्स करण्यात आल्या यातील काही कमेंट्स या अत्यंत हिन खालच्या पातळीवरील अश्लील व चरित्रहनन करणाऱ्या आहेत. सदर कमेंट्स या वसंत मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सहकारी करत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केलाय. वरील प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे व त्याचे सहकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषदेत केली आहे 

वसंत मोरेच्या विरोधात विनयभंग, चरित्रहनन आणि सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसेपुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेवक बाबू गावस्कर, सुधीर धावडे, अश्विन चोरगे आदी उपस्थित होते. सुधीर धावडे व त्यांचे कुटुंबीय हे मानसिकदृष्ट्या अतिशय अस्थिर झाले आहे. तसेच सदर प्रकरणा मुळे त्याच्या जीवाला धोका असल्याचे ही सुधीर धावडे यांनी यावेळी सांगितले. वरील प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे व त्याचे सहकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी ही मागणी केली असून त्या नुसार कोथरूड पोलीस स्टेशन ने गुन्हा दाखल केला आहे. परंतु या गुन्हाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या वसंत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ज्या आरोपी वर गुन्हा दाखल केला आहे त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून यापूर्वी देखील त्यांनी त्रास दिलेल्या व्यक्ती संदर्भात देखील गुन्हे दाखल करावे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून वसंत मोरे यांना अटक करावी अशी मनसेची मागणी आहे.

Web Title: File a case against Vasant More Demand of MNS workers in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.