नळपाणीतील भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:57+5:302021-03-23T04:11:57+5:30

ग्रामपंचायतमध्ये सन २००५ ते २०१८ या कालावधीत जिल्हा परिषदेमार्फत नळपाणी योजनेसाठी २६ लाख ४३ हजार १९७ रूपये निधी मिळाला ...

File a case of corruption in tap water | नळपाणीतील भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करा

नळपाणीतील भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करा

Next

ग्रामपंचायतमध्ये सन २००५ ते २०१८ या कालावधीत जिल्हा परिषदेमार्फत नळपाणी योजनेसाठी २६ लाख ४३ हजार १९७ रूपये निधी मिळाला होता. त्यापैकी १९ लाख ६ हजार ९७९ इतका निधी या योजनेवर खर्च झालेला असून सनदी लेखापाल यांनी योजनेचे लेखापरीक्षण करून २० ऑगस्ट २०१८ रोजी अहवाल समितीस दिलेला आहे. तसेच शिल्लक निधी ७ लाख ३६ हजार २१८ रूपये ९ सप्टेंबर २००९ अखेर ग्रामपंचायत खात्यावर शिल्लक राहणे आवश्यक होते. परंतु संबंधित रक्कम समितीने परस्पर खर्च केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत संबंधित शिल्लक रक्कम व त्यावरील व्याज असे एकंदरीत १४ लाख ९८ हजार २५६ भरणा करावा असे तत्कालीन अध्यक्ष ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे ग्रामपंचायतीस भरणा करावा असे सांगितले होते.

मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे यांनी फक्त शिल्लक रक्कम १० सप्टेंबर २०१८ रोजी शासन शासन तिजोरीत भरली. परंतु त्या रक्कमेवरील दंडनीय व्याज भरले नाही. याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले नाही. याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे यासाठी आंबेगाव तालुका स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, प्रविण पडवळ, अनिल पोखरकर, कैलास पोखरकर, वनाजी बांगर, पंकज पोखरकर, उमेश पडवळ, अरूण बांगर, विकास एरंडे यांनी पंचायत समिती आवारात बेमुदत उपोशण व धरणे आंदोलन सुरू केले आहे.

--

चौकट

एक एर्प्रीललाहोणार चौकशी

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद पुणे यांनी दिलेल्या पत्रानुसार ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष व सचिव, तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपअभियंता, शाखा अभियंता व विदयमान ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष व सचिव, ग्रामसेवक , सरपंच, उपअभियंता, शाखा अभियंता तसेच तक्रारदार, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथील पाणीपुरवठा योजनेचे चौकशीसाठी एक एप्रिल रोजी जिल्हा परीषद पुणे येथे उपस्थित रहाण्यास सांगितले असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.

--

Web Title: File a case of corruption in tap water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.