खोटी साक्ष देणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांविरोधात गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:28+5:302021-03-09T04:13:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यात दोन साक्षीदारांनी खोटी माहिती देऊन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन प्रत्यक्षदर्शी ...

File charges against eyewitnesses who give false testimony | खोटी साक्ष देणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांविरोधात गुन्हा दाखल करा

खोटी साक्ष देणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांविरोधात गुन्हा दाखल करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यात दोन साक्षीदारांनी खोटी माहिती देऊन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांविरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना शिक्षा न झाल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच, गंभीर खटल्यांमध्येही न्यायालयात खोटी साक्ष दिली जाऊ शकते, असा साक्षीदारांचा समज होऊ शकतो, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. गणेश उर्फ गोपी हनुमंत कांबळे (वय २९) आणि सूरज उर्फ सुरजित सुरेश जगताप (वय ३०, दोघेही रा. गंगानगर, फुरसुंगी) अशी त्यांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३ जानेवारी २०११ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास अश्विन उर्फ अशोक श्रीमंत कांबळे यांचा खून झाला होता. याप्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या सहाही जणांची न्यायालयाने पुराव्याअभावी न्यायालयाने मुक्तता केली आहे.

याप्रकरणात सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी कामकाज पाहिले. कांबळे व जगताप यांनी आरोपींविरूध्द न्यायालयात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली आहे. घटनेच्या वेळी ते मयत व सर्व आरोपी हत्यारांसह हजर होते असे अ‍ॅड. अगरवाल यांनी पुराव्याच्या आधारे दाखवून दिले. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबानुसार (सीआरपीसी कलम १६४) ते आरोपींना ओळखत होते. घटनास्थळावर हजर असूनही त्यांनी त्यांच्या साक्षीतून या गोष्टी वगळल्या. कारण त्यांना आरोपींना वाचवायचे होते असा निष्कर्ष काढत न्यायालयाने याप्रकरणातील एफआयआर, न्यायनिर्णय, दोन्ही साक्षीदारांचा पुरावा, सीआरपीसी कलम १६४ अन्वये त्यांचा जबाब आणि अन्य साक्षीदाराचा पुरावा घेऊन कागदपत्रांसह खटला ३० दिवसांच्या आत दाखल करावा, असे आदेश दिले.

Web Title: File charges against eyewitnesses who give false testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.