गुन्हे दाखल करा, घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:37+5:302021-04-19T04:10:37+5:30

पुणे : दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या धमक्या देत आहात, आधी अनिल देशमुख होते, आता तुम्ही आलात़ काय ...

File a crime, don't be afraid: Chandrakant Patil | गुन्हे दाखल करा, घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

गुन्हे दाखल करा, घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

Next

पुणे : दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या धमक्या देत आहात, आधी अनिल देशमुख होते, आता तुम्ही आलात़ काय गुन्हे दाखल करायचे ते करा ? आम्ही घाबरत नाही़, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना सोडविण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांवर, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याचा इशारा देणाऱ्या गृहमंत्री वळसे पाटील यांना प्रतिउत्तर दिले आहे़

कोरोना आपत्तीत एकत्र येऊन काम करण्याऐवजी राज्यातील सरकार केवळ रोज नवनवीन खोटे आरोप केंद्र सरकार व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर करीत आहे़ पण आम्हीही राजकारणांमधील माहिर आहोत, अभ्यासपूर्ण व आकडेवारीसह बोलत असतो़ असे सांगत पाटील यांनी, देशात सर्वाधिक लस ही महाराष्ट्राला दिल्या गेल्या असल्याचे सांगून या सरकारने त्यांचाही काळाबाजार केला असल्याचा आरोप केला़ तसेच लसीबाबत महाराष्ट्र सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही केली़

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे आरएसएस व जनकल्याण समितीच्यावतीने उभारलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शन देताना संबंधित कंपनीने अ‍ॅडव्हान्स मागितला होता. परंतु, राज्य सरकारने त्यास नकार दिला़ तेव्हा भाजपने काही लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला़ परंतु, दमबाजी करून संबंधित कंपनी मालकावर दबाव आणला जात असून, श्रेय दुसऱ्याला जाऊ नये, यासाठी राज्य सरकार हा प्रकार करीत आहे़ तुम्हाला जनतेला रेमडेसिविर इंजेक्शन द्यायचे होते, तर विना टेंडर तुम्ही ते खरेदी करू शकला असता, पण केवळ हे सरकार कमिशनसाठी अडून बसल्याचेही ते म्हणाले़

सत्तेतील काही आमदार सरकारविरोधातच आंदोलन करायला निघाले आहेत़ पण आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू असल्याचेही ते म्हणाले़

------------

Web Title: File a crime, don't be afraid: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.