जमीन ताब्यात घेण्यासाठी गावात लष्कराला आणणाऱ्या कर्नलवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 10:35 PM2019-06-23T22:35:02+5:302019-06-23T22:35:44+5:30
गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते.
दावडी : राजगुरूनगर (दावडी) : खेड तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क 30 ते 40 जवान आणले होते. शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून नुकसान केल्यामुळे या कर्नल केदार गायकवाड याच्याविरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार मोनिका गणेश गाडे (रा. खालुब्रे ता खेड ) यांचे नांदावे सुनील नामदेव भरणे (रा माण ता. मुळशी ) यांनी गुळाणी येथील जमीन गट नंबर २४४ असलेली जमिन सन२०१८ खरेदी करून कागदपत्रे सातबारा वरती नावे झाल्याने या या सदर या जमिनीचे मालक भरणे व गाडे आहेत. ( दि २२ ) रोजी गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते. गायकवाड हे त्या जवानांना घेऊन गावामध्ये रायफल्स बेकायदा जमाव जमून फिरून दहशत निर्माण होईल असे कृत्य करत होते. त्यानंतर त्यांनी सदर जवानासह गाडे व भरणे यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टर लावून मशागत करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्याबरोबर असलेले लष्कराचे जवान हे शस्त्रधारी असल्याने भीतीपोटी फिर्यादीने कुठल्याही प्रकारचा विरोध अथवा प्रतिबंध केला नाही.
शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान केले. कर्नल केदार गायकवाड यांनी जमिनीमध्ये येऊ नये म्हणून गाडे व भरणे कुटुंबीयांना व गावातील लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून याकरता शस्त्रांसह लष्करी जवान आणून दहशत निर्माण केलेली आहे .याबाबत खेड पोलीस ठाण्यात मोनिका गणेश गाडे यांनी कर्नल केदार गायकवाड यांच्याविरुद्ध फिर्याद गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
याबाबात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळाणी येथील परिमल विजय गायकवाड यांच्या कुटुंबातील काही व्यक्तीनी वारस हक्कांनी मिळालेली जमीन दिलीप नामदेव भरणे ( रा. मुळशी ) यांना सन २०१८ विकली होती. मात्र, गायकवाड कुटुंबियांनी ही जमीन आमची आहे म्हणून या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. सध्या दावा दिवाणी न्यायालयात सुरू आहे. या घटनेबाबत तक्रार दाखल न झाल्याने खेड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता सीआरपी कलम १४९न्वे राखण्यासाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता.