बांगलादेशी नागरिक हटाव प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 08:33 PM2020-02-25T20:33:38+5:302020-02-25T20:38:09+5:30

शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेकायदेशीरपणे जमाव जमवून बांगला देशी म्हणणाऱ्या व घरामध्ये बेकायदेशीरपणे शिरल्याबद्दल सहकारनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे़. 

file criminal case against Raj Thackeray MNS activists about anti Bangladeshi movement | बांगलादेशी नागरिक हटाव प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बांगलादेशी नागरिक हटाव प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next

पुणे : बांगलादेशी नागरिकांची शोध मोहिम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे़.  बांगलादेशी असल्याचा संशय घेऊन बेकायदेशीरपणे घरात शिरुन धमकी दिल्या प्रकरणी सहकारनगरपोलिसांनीमनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रोशन नुरहसन शेख (वय ३५, रा़ गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़.  बांगलादेशी असल्याचा संशय घेऊन मनसेचे अजय शिंदे, सचिन काटकर व त्यांच्या ७ ते ८ साथीदारांनी  २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता बालाजीनगरमधील गुलमोहर अपार्टमेंटमध्ये शिरले. त्यांनी रोशन शेख व इतरांच्या घरात शिरुन तुम्ही बांगलादेशी आहे़,असे म्हणून त्यांना घरातून बाहेर आणले़.  तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिली आहे़. अचानक घडलेल्या या प्रकाराने हे सर्व जण घाबरले़.

 त्यानंतर त्यांनी सर्वांना घराच्या बाहेर इमारतीच्या खाली घेऊन आले़. त्यांच्याबरोबर दिलशाद अहमद हसन (वय ३५), बप्पी नेमाई सरदार (वय२७) यांना ही बांगला देशी समजून खाली रोडवर आणले़. त्यावेळी त्यांनी आधार कार्ड व मतदान कार्ड त्यांना दाखविले़ तसेच आपण भारतीय असलयाचे सांगितले़. तरीही त्यांना जबरदस्तीने सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले़. तेथे त्यांनी पोलिसांना पुरावे दाखविले़ पोलिसांनी त्यांची चौकशी करुन पुरावे पाहून त्यांना सोडून दिले होते.शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेकायदेशीरपणे जमाव जमवून बांगला देशी म्हणणाऱ्या व घरामध्ये बेकायदेशीरपणे शिरल्याबद्दल सहकारनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे़. पोलीस निरीक्षक विजय पुराणिक अधिक तपास करीत आहेत.

Web Title: file criminal case against Raj Thackeray MNS activists about anti Bangladeshi movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.