आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुला व सुनेविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:38+5:302021-04-24T04:10:38+5:30
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढणाऱ्या ...
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढणाऱ्या मुलगा व सुनेवर आईवडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात धर्मराज यशवंत वळसे (वय 66, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली आहे.तक्रारीत म्हटले आहे की, आपला मुलगा किरण धर्मराज वळसे व सून सुप्रिया किरण वळसे या दोघांनी सन 2019 ते 22 एप्रिल 2021 पर्यंत निरगुडसर येथे माझ्या राहत्या घरात आम्ही वयोवृद्ध असून आमचा नवरा-बायकोचा सांभाळ करणे यांचे कर्तव्य असताना देखील आमचा सांभाळ केला नाही. म्हणून हतबल झालेल्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.