सराईत गुन्हेगारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:04+5:302021-04-01T04:10:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन जाणाऱ्या तरुणाला सराईत गुंडांनी अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करून जबर ...

Filed a case of attempted murder against a criminal in Sarai | सराईत गुन्हेगारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

सराईत गुन्हेगारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन जाणाऱ्या तरुणाला सराईत गुंडांनी अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करून जबर जखमी करण्याचा प्रकार वारजे माळवाडीतील रामनगरमध्ये घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दाद्या मिसाळ (रा. रामनगर, वारजे), शेखर खवळे (रा. कर्वेनगर) बाळ्या येनपुरे आणि सचिन हिरेमणी (दोघे रा. रामनगर, वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी परशुराम गायकवाड (वय २७, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गायकवाड हे २९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन मोटारसायकलवरून घरी जात होते. यावेळी रामनगरमधील हनुमान चौकात गुंडांनी त्यांची गाडी गायकवाड यांच्या गाडीला आडवी घालून थांबायला लावले. त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करू लागले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या मदतीला येत असलेल्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावून परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Filed a case of attempted murder against a criminal in Sarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.