शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:45+5:302021-05-23T04:09:45+5:30
मंचर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कचरदास दगडू भोजने यांनी यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : ...
मंचर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कचरदास दगडू भोजने यांनी यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : २२ जुलै २००७ ते १६ मार्च २०२० पर्यंतच्या कालावधीमध्ये तहसीलदार आंबेगाव यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सोमनाथ तुकाराम भेके (रा. भेकेमळा, मंचर, ता. आंबेगाव) यांनी सहादू लक्ष्मण भेके यांचा दि. 28 नोव्हेंबर 1969 रोजी मृत्यू झालेला होता. त्याप्रमाणे ग्रामपंचायत नोंद क्रमांक 95 दिनांक 28 नोव्हेंबर 1969 रोजी मृत्यू नोंद असताना देखील शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने 22 जुलै 2007 रोजीचे पूर्वी तहसीलदार आंबेगाव यांच्याकडे सहादू लक्ष्मण भेके यांचा मृत्यू 7 डिसेंबर 1995 रोजी झाला असलेबाबत त्यांची मृत्यू नोंदणी होणेबाबत अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केले. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी व बनावट माहिती भरून ती खरी असल्याचे भासवून त्याप्रमाणे तहसीलदार यांच्या कार्यालयाकडून आदेश प्राप्त करून घेऊन 7 डिसेंबर 1995 रोजी मृत्यूबाबतची नोंद होऊन दाखला प्राप्त करून घेतला. तो दाखला शासकीय कामासाठी वापरात आणून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजने यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.