कामगार पुरवठा न करणाऱ्या तिघा विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:08 AM2021-05-01T04:08:57+5:302021-05-01T04:08:57+5:30
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 ऑक्टोबर 2020 रोजी शैनेश्वर गूळ प्रोडक्ट्स, अवसरी बुद्रुक येथे कारखान्यासाठी ऊसाची व ऊस तोडणी ...
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 ऑक्टोबर 2020 रोजी शैनेश्वर गूळ प्रोडक्ट्स, अवसरी बुद्रुक येथे कारखान्यासाठी ऊसाची व ऊस तोडणी करता कामगारांची आवश्यकता होती. त्यावेळी अतुल भगवान बांगर (रा.खडकी पिंपळगाव) यांनी ऊस तोडणी कामगार मुकादम धारासिंग एकनाथ पवार (सध्या रा.पिंपळगाव, ता. आंबेगाव, मूळ रा.जळगाव) यांची भेट घालून देऊन ऊस तोड कामगार पुरवतो असे सांगितले. कामगारांसाठी ॲडव्हान्स म्हणून सात लाख रुपये देणेबाबत त्याचा भाऊ भीमा एकनाथ पवार (रा.गणेशपुर ता.जळगाव) यांच्या बँक खात्यात तीन लाख रुपये आर. टी. जी. एस. द्वारे पाठविण्यात आले. त्यांनी ते स्वीकारूनही अद्याप धारासिंग पवार, भीमा पवार व अतुल बांगर यांनी कामगार पाठविण्यास टाळाटाळ केली आहे. कोणत्याही प्रकारचे ऊसतोड कामगार न पुरिवता पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खबाले करत आहेत.