ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल
By admin | Published: May 12, 2017 05:26 AM2017-05-12T05:26:36+5:302017-05-12T05:26:36+5:30
धनकवडी गावठाणात ग्रामदैवत जानूबाई देवीच्या उत्सवादरम्यान देवीच्या मिरवणुकी वेळी लावण्यात आलेल्या ध्वनिप्रक्षेपकांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : धनकवडी गावठाणात ग्रामदैवत जानूबाई देवीच्या उत्सवादरम्यान देवीच्या मिरवणुकी वेळी लावण्यात आलेल्या ध्वनिप्रक्षेपकांच्या आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने एकूण ११ मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैभव माधवराव धनकवडे (रुद्र प्रतिष्ठान मित्र मंडळ, रा. मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स अमर मेडिकलसमोर, धनकवडी), अमित प्रदीप संचेती (वीर सावरकर प्रतिष्ठान, रा. मोहननगर भारती विद्यापीठ सोसायटी चौक, धनकवडी), ॠषीकेश राजेंद्र भोसले (अलिशान मंडळ, रा. स.नं. ३ स्वराज्य कॉलेजसमोर, तळजाई पठार धनकवडी), सचिन उत्तमराव पोटे (फाईव्ह स्टार मित्र मंडळ, रा. श्रीनगर धनकवडी), रवींद्र काळूराम ठमाले (लव्हर्स ग्रुप रा. स.नं. ३७/१३ तानाजीनगर केशव कॉम्प्लेक्स, धनकवडी), अमेय राजेंद्र पासलकर (मीट युवक मित्र मंडळ, रा.स.नं ७ साई दत्तनगर, तळजाई पठार धनकवडी), राजेंद्र गोगावले (श्रीनाथ मित्र मंडळ, रा. गोगावले बिल्डिंग, श्रीनाथ चौक, धनकवडी), सूरज बापूसाहेब धनकवडे (आईसाहेब ग्रुप, रा. जयनाथ तालमीशेजारी, धनकवडी), प्रेम प्रशांत ठकुरे (छत्रपती शिवराय ग्रुप, रा. श्री साई अपार्टमेंट वनराई कॉलनी, धनकवडी), पवन यशवंत धनकवडे (दोस्ती ग्रुप, रा. जयनाथ चौक, धनकवडी) आणि उपेंद्र प्रेमकुमार यादव (राजे ग्रुप, रा. नवरंग सोसायटी, धनकवडी) अशा ११ मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.