कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:30+5:302021-07-08T04:09:30+5:30

याप्रकरणी सारंग बबन मसुगडे (रा. शिरवली, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जुलै ...

Filed a fraud case against the company | कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

याप्रकरणी सारंग बबन मसुगडे (रा. शिरवली, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. कंपनीमध्ये मानसी ट्रेडिंग कंपनीची गाडी (एमएच-२३, एयू ४५५०) आली असताना त्यातील माल खराब असल्याचे माहिती असताना सारंग मसुगडे याने या कंपनीच्या चालकाकडे ४ हजार रुपयांची मागणी केली. त्याबाबत फिर्यादी यांनी अधिक माहिती घेत खातरजमा केली. मसुगडे याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने यापूर्वीही गौरव अग्रवाल कंपनीकडील मकेचा खराब माल उतरवून घेण्यासाठी स्वत:च्या फायद्यासाठी दोनदा १० हजार व ५ हजार अशी १५ हजारांची रक्कम स्वीकारल्याचे आढळून आले. कंपनीची ते फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

————————————————

Web Title: Filed a fraud case against the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.