शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 11:04 PM2018-08-26T23:04:49+5:302018-08-26T23:05:09+5:30
शालेय विद्यार्थिनीसोबत अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला.
विमाननगर - शालेय विद्यार्थिनीसोबत अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियम कायदा २०१२ (पॉक्सो)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही येरवड्यातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत आहे. एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू असताना एका वर्गखोलीत मुख्याध्यापक सुनील शिंदे याने पीडित विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव केले. या विद्यार्थिनीने स्वतःची सुटका करून बाहेर निघून आली, घडलेला प्रकार पालकांना सांगितला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने संबंधित पालकांनी शिक्षण संस्थेकडे मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली होती.
या संदर्भात संस्था चालकांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेऊन याची माहिती येरवडा पोलिसांना दिली. त्यानुसार शनिवारी रात्री पीडित विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध (पोस्को अॅक्ट ) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुख्याध्यापक सुनील शिंदे फरार असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्ना वाघमारे करीत आहेत.