बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णीं व पत्नी हेमंती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 08:31 PM2017-10-28T20:31:58+5:302017-10-28T21:03:08+5:30

प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filing a complaint against construction worker DS Kulkarni and his wife | बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णीं व पत्नी हेमंती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णीं व पत्नी हेमंती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next

पुणे- प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये आणि ४२० अंतर्गत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी जितेंद्र नारायण मुळेकर (वय ६५, रा़ कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. 

गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल डीएसके उद्योगसमुहाविरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या संदर्भात पोलिसांनी डीएसके यांना चौकशीसाठी यापूर्वी तीन वेळा बोलविण्यात आले होते. त्या त्या वेळी त्यांनी गुंतवणुकदारांना पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्याने गुंतवणुकदारांनी प्रत्यक्ष फिर्याद न देता काही दिवस वाट पाहण्याचे ठरविले होते़ तरीही त्यांनी पैसे परत न केल्याने शेवटी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी जितेंद्र मुळेकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहेत की, त्यांनी डी एस के ब्रदर्स आणि डी एस के सन्स या कंपनीमध्ये २०१४ मध्ये एकूण १४ लाख ४० हजार रुपये गुंतविले होते़ त्यापैकी १ लाख ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही त्यांचे मुद्दल व व्याज असे सर्व मिळून ४  लाख ४० हजार रुपये परत मिळाले नाही़ अनेकदा परत मागितले असतानाही ते त्यांनी परत न देता फसवणूक केल्याचे म्हटले आहे़ 

मुळेकर यांच्याबरोबर आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे २२ जणांनी तक्रारी दिल्या आहेत़ त्यांची यापुढील काळात फिर्याद घेण्यात येणार आहे़ याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर हे तपास करीत आहेत़ 

डीएसके उद्योगसमुह गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत आला आहे़ या वर्षाच्या सुरुवातीपासून गुंतवणुकदारांना ते मुद्दल व व्याज परत करु शकलेले नाही़ डी.एस कुलकर्णी यांनी त्यांना आपण सर्वांचे पैसे परत करु असे बोलून आजवर थोपवून धरले होते़ सुमारे १५ दिवसांपूर्वी गुंतवणुकदार फिर्याद देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात जमले होते़ तेव्हा त्यांनी जर गुन्हा दाखल केला तर पोलिसांना मला अटक करावी लागेल, तुम्हाला जर पैसे हवे असतील तर, तुम्ही मला जिवंत बाहेर ठेवले पाहिजे, तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ, असा भावनिक सवाल प्रसिद्ध उद्योगपती डी.एस कुलकर्णी यांनी केला होता़ आपण मालमत्ता विकून उद्यापासून व्याज देण्यास सुरुवात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले होते़ त्यावेळी या गुंतवणुकदारांनी काही दिवस वाट पाहण्याचे ठरुन फिर्याद दिली नव्हती़ त्यानंतरही पैसे न मिळाल्याने शेवटी आज शनिवारी फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने डीएसके यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे़

Web Title: Filing a complaint against construction worker DS Kulkarni and his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.