स्मार्ट सिटीत मतदार संपर्कावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:35 AM2019-04-24T00:35:27+5:302019-04-24T00:36:08+5:30

शेतमजुरांशी श्रीरंग बारणे यांचा संवाद; महायुतीची पिंपरी कॅम्पमध्ये फेरी

Fill in contact with voters in the smart city | स्मार्ट सिटीत मतदार संपर्कावर भर

स्मार्ट सिटीत मतदार संपर्कावर भर

Next

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड परिसरात शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथे रॅली काढली. त्यात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील व्यापारी बांधव सहभागी झाले होते.

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार संपर्क आणि संवादावर भर दिला आहे. रॅलीची सुरुवात आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी येथून झाली. ही रॅली पुढे बौद्धनगर, भाटनगर, मेन बाजार, शगुन चौक, साई चौक, जायका चौक, जयहिंद चौक, अशोक थिएटर परिसर, डीलक्स रोड, रिव्हर रोड, सुभाषनगर आणि पुन्हा शगुन चौक या मार्गावरून काढली. या वेळी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक संदीप वाघेरे, दीपक मेवानी, किशोर केसवानी, लच्छू बुलानी, कमल मलकानी, ज्योतिका मलकानी, आरपीआयचे लक्ष्मण गायकवाड, शिवसेनेचे डॉ. अभिजित भालशंकर, विभागप्रमुख अनिल पारचा, उपविभागप्रमुख शेखर महाडिक, सोनू शिरसाट उपस्थित होते.

थेरगावात कोपरा सभा झाली. त्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मार्गदर्शन केले. या वेळी नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक नीलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, काळूराम बारणे, तानाजी बारणे उपस्थित होते. जगताप म्हणाले, की चिंचवड मतदारसंघातून महायुतीला मताधिक्य दिले पाहिजे. सर्वांनी आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून काम करायचे आहे. पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, २४ बाय ७ ही पाणीपुरवठ्याची योजना शहरात सुरू आहे. केंद्र सरकार या योजनांना सहकार्य करीत आहे. खासदार बारणे यांनी केंद्र सरकारशी निगडित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. 

शेतमजुरांशी संवाद
मावळातील विविध गावांना बारणे यांनी भेट दिली. तसेच धामणे येथील शेतमजुरांशी संवाद साधला. या वेळी परिसरातील गावांनाही त्यांनी भेट दिली.

Web Title: Fill in contact with voters in the smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.