घरात येणारे प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये भरून द्या रिसायकलिंगला - निसर्गात जाऊन प्रदूषण होईल कमी; प्रत्येकाला करता येईल प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:34+5:302021-08-21T04:14:34+5:30

प्लॅस्टिक प्रदूषणाची समस्या जगभरात जाणवत आहे. त्याचे दुष्परिणाम आता डोळ्यासमोर गेल्या काही वर्षांत अयोग्य व्यवस्थापनाअभावी दिसून येत आहेत. ...

Fill in-house plastic bottles for recycling - reduce pollution by going to nature; Everyone can experiment | घरात येणारे प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये भरून द्या रिसायकलिंगला - निसर्गात जाऊन प्रदूषण होईल कमी; प्रत्येकाला करता येईल प्रयोग

घरात येणारे प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये भरून द्या रिसायकलिंगला - निसर्गात जाऊन प्रदूषण होईल कमी; प्रत्येकाला करता येईल प्रयोग

Next

प्लॅस्टिक प्रदूषणाची समस्या जगभरात जाणवत आहे. त्याचे दुष्परिणाम आता डोळ्यासमोर गेल्या काही वर्षांत अयोग्य व्यवस्थापनाअभावी दिसून येत आहेत. याकरता गेली अनेक वर्षांपासून टेल्स ऑर्गनायझेशन संस्था काम करीत असून आजवर सुमारे वीस टनांपेक्षा अधिक प्लॅस्टिक कचरा पर्यावरणात पडण्यापासून वाचविण्यात आला आहे. प्रत्यक्षात प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबवित विविध ठिकाणी पुनर्प्रकियेसाठी पाठवण्याचे काम करीत आहेत. लोकेश बापट याचबरोबर संस्थेतील अनेक सदस्य संकेत जोगळेकर, विश्वास घावटे, अभिजित घडशी व इतर गेल्या काही वर्षांत घरगुती पातळीवर तयार होणारा सर्व प्रकारच्या कचऱ्याच्या इको ब्रिक्स बनवत आहेत. आजवर शेकडो बाटल्या देखील पुनर्प्रक्रियेसाठी दिल्या आहेत.

- —————————————

घरोघरी व्हाव्यात इकोब्रिक्स

कोरोनाच्या काळात पार्सलचे पॅकिंग, रॅपर्स, कॅरी बॅग्स, वेष्टन, बाटल्या असे प्रकार वाढले. परंतु इकॉब्रिक्सच्या सोप्या माध्यमातून असा प्रकारचा कचरा साठवून तो इकॉब्रिक्सच्या साह्याने पुनर्प्रक्रियेसाठी पाठवणे सोपे पडते. प्लॅस्टिक बाटली मागील बाजूने कटरने सहज कापून मोठ्या प्रमाणात कचरा सहज भरला जाऊ शकतो व बाटली पूर्ण भरली की, झाकण बंद करून त्यास चिकटपट्टी लावून त्या सहज व सुरक्षितरित्या हाताळता येऊन पुनर्प्रक्रियेसाठी पाठवता येतात. लोकेश बापट व जान्हवी बापट अशा प्रकारच्या इकोब्रिक्स करण्याकरता घरी कामावर येणाऱ्या महिलांना याची माहिती देऊन त्यांच्याकडून पण इकॉब्रिक्स तयार करीत आहेत.

——————————

Web Title: Fill in-house plastic bottles for recycling - reduce pollution by going to nature; Everyone can experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.