कोंढापुरी तलाव भरून द्या, अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:30+5:302021-05-24T04:09:30+5:30
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या उन्हाळ्यामध्ये बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू ...
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या उन्हाळ्यामध्ये बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. शेतकऱ्यांनी चासकमान प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेटी घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, अधिकारी कोंढापुरी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास टाळाटाळ करत आहेत. या तलावातील पाण्यावरती रांजणगाव गणपती, कोंढापुरी, खंडाळे, पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, वरुडे, वाघाळे या गावांतील पाणीपुरवठा योजना व परिसरातील हजारो एकर शेती अवलंबून असल्याने या तलावात प्रत्येक आवर्तनाला पाणी सोडून तलाव पाण्याने भरून द्यावा, अशी मागणी पाचुंदकर यांनी केली आहे.
कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांसह मानसिंग पाचुंदकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.