थकबाकी भरा! शेवटचा दिवस, कृषी संजीवनी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:10 AM2017-11-30T02:10:20+5:302017-11-30T02:10:30+5:30
बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ४१ हजारांहून अधिक कृषिपंपधारकांनी २४ कोटी ८२ लाख रुपये थकबाकीचा भरणा केला आहे.
बारामती : बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ४१ हजारांहून अधिक कृषिपंपधारकांनी २४ कोटी ८२ लाख रुपये थकबाकीचा भरणा केला आहे. तर पुणे परिमंडलाचे कार्यक्षेत्र असलेल्या हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील १८ हजार ७४२ कृषीपंपधारकांनी १४ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा केली आहे. कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी गुरुवार ३० नोव्हेंबरपर्यंच मुदत आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरण्याची सवलत जाहीर केली आहे. याशिवाय ज्या शेतकºयांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत करण्यात येणार आहे.
१. कृषी संजीवनी योजनेत ३१ मार्च २०१७ पर्यंत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांतील एक लाख ५९ हजार ३२३ ग्राहकांकडे ७५४ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ५२६ कोटी ६८ लाख रुपयांची मूळ थकबाकी दिलेल्या हप्त्यांत चालू वीजबिलांसह भरल्यास २११ कोटी ५५ लाख रुपयांचे व्याज व ६ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा शासनाचा विचार आहे. दरम्यान, बारामती मंडलात कृषिपंपांचे बिल भरण्यास शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यातील ४१ हजार १९४ शेतकºयांनी २४ कोटी ८२ लाख रुपये भरून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदवला आहे.
२.पुणे परिमंडलातील ९0 हजार ६४६ कृषीपंपधारक शेतकºयांना वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे. हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील या कृषीपंपधारकांकडे २३१ कोटी ६३४ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील १८५ कोटी रुपयांच्या मूळ थकबाकीचा दिलेल्या हप्त्यांमध्ये चालू वीजबिलांसह भरणा केल्यास ४४ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी ३0 लाख रुपयांचा दंड माफ करण्यात येणार आहे. आतापर्र्यंत १८ हजार ७४२ कृषीपंपधारकांनी १४ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा करून या योजनेत सहभाग नोंदविला आहे.