चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्ड्यात स्वखर्चाने टाकला भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:20+5:302021-07-30T04:10:20+5:30
तळेगाव ते चाकण या महामार्गावर रानुबाईमळा ते चौकापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तर साइडपट्ट्याही राहिल्या नव्हत्या, यामुळे ...
तळेगाव ते चाकण या महामार्गावर रानुबाईमळा ते चौकापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तर साइडपट्ट्याही राहिल्या नव्हत्या, यामुळे यातून वाहने चालवणे जिकिरीचे झाले होते. सध्या सुरू असलेल्या पावसाने या खड्ड्यात पाणी साठून अपघात घडत होते. या महामार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत वाहनचालकांची अडचण ओळखून आमदार दिलीप मोहिते पाटील मित्र मंडळाच्यावतीने या ठिकाणी मुरूम टाकून खड्डे भरून घेण्यात आले आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साइडपट्ट्या पूर्णपणे खड्ड्यात गेल्या होत्या. यात पावसाचे पाणी साचल्याने वाहने चालवणे धोकादायक ठरू लागले होते. यामध्ये मुरूम भराव करून, त्यावर रोलिंग केल्याने रस्त्यावर वाहने चालवणे सोपे झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश बोत्रे यांच्या सहका-यांसह मयूर मोहिते, गणेश बोत्रे, महेंद्र मेदनकर, जीवन सोनवणे, राहुल नाईकवाडी, विशाल नाईकवाडी, मनोज खांडेभराड, शहराध्यक्ष राम गोरे यांनी काम पूर्ण केले.
२९ चाकण
चाकण येथील तळेगाव रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम भराव करण्यात आला.