राज्यमंत्री भरणे- आप्पासाहेब जगदाळे यांच्यात दुरावा कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:12 AM2021-09-14T04:12:56+5:302021-09-14T04:12:56+5:30

(सतीश सांगळे) कळस : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या झालेल्या जाहीर कार्यक्रमापासून ...

Filling Minister of State: Is there a gap between Appasaheb Jagdale? | राज्यमंत्री भरणे- आप्पासाहेब जगदाळे यांच्यात दुरावा कायम?

राज्यमंत्री भरणे- आप्पासाहेब जगदाळे यांच्यात दुरावा कायम?

googlenewsNext

(सतीश सांगळे)

कळस : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या झालेल्या जाहीर कार्यक्रमापासून जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दूर राहणेच पसंत केले आहे. त्यामुळे बँकेच्या आगामी निवडणुकीचे रण पेटणार असल्याचे संकेत आहे. भरणे आणि जगदाळे यांच्यातील दुरावा कायम राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय शोधावा लागणार आहे.

इंदापूर तालुक्यात गेली २० वर्षे तालुका गटातून कोणताही पक्ष असला तरी आपली सोसायटी गटातून पकड घट्ट ठेवत जगदाळे यांनी आपले संचालकपद कायम ठेवले आहे. संचालक म्हणून त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखले आहे. २००२ मध्ये जगदाळे यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा बँकेत प्रवेश केला संचालकपद मिळवले. मात्र, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी २००४ मध्ये हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला व नंतर झालेल्या २००८ ला जिल्हा बँकेचे निवडणुकीत पाटील यांच्या सहकार्याने तालुका गटातून निवडणूक जिंकली. पुढे २००९ ला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना विधानसभेला पाठिंबा दिला. पुढे २०१४ ला भरणे यांना विधानसभेला निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. भरणे यांच्या पाठबळावर २०१५ ला बँकेवर बिनविरोध पाठिवण्यात आले. मात्र २०१९ ला जगदाळे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने भरणे व जगदाळे यांच्यात मतभेद निर्माण झाले.

मतभेदाचे रूपांतर जगदाळे यांनी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना आपल्या समर्थकांसह जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेला अटीतटीची निवडणूक झाली. तसेच भरणे व जगदाळे यांनी एकत्रित लढविलेल्या बाजार समिती व खरेदी-विक्री संघावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे भरणे व जगदाळे यांच्यात मतभेदाची दरी वाढतच गेली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश न करता पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेले जगदाळे आगामी महिन्यात होणाऱ्या बँकेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, शनिवारी (दि. ११) तालुक्यात लासुर्णे व पिंपरी या ठिकाणी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या उपस्थितीत बँकेच्या झालेल्या जाहीर कार्यक्रमात जगदाळे यांनी दूर राहणेच पसंत केले आहे. दुसरीकडे बावडा येथे रविवारी (दि. १२) माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. यावेळी पाटील यांच्यासमवेत आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून, नेत्यांपासून जगदाळे यांनी दूर राहणे पसंत केल्याचे दिसून येते. भविष्यात हा दुरावा कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची कसोटी पणाला लागणार

जिल्हा बँकेचा तालुका गट बिनविरोध आल्यास आगामी कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ यांच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सहकारी सोसायटी मतदारसंघात भरणे यांना पकड मजबूत ठेवावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील जाहीर शेतकरी मेळाव्यात जे गेले त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नकोच ,असे सांगून बँकेवर नवीन लोकांना घेण्याचे सूतोवाच केले होते. तसेच आज (दि १४) उपमुख्यमंत्री अजित पवार भादलवाडी (ता. इंदापूर) येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या आजच्या कार्यक्रमादरम्यान, काय घडामोडी घडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

फोटोओळी— दत्तात्रेय भरणे , आप्पासाहेब जगदाळे.

१३०९२०२१ बारामती—०५

Web Title: Filling Minister of State: Is there a gap between Appasaheb Jagdale?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.