अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणारा चित्रपट दिग्दर्शक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:49+5:302021-07-17T04:10:49+5:30

पुणे : हातउसने स्वरूपात ६ लाख रुपये ५ टक्के व्याजाने दिले असताना मोबदल्यात ७ लाख ४० हजार रूपये परत ...

Film director arrested for illegally lending money | अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणारा चित्रपट दिग्दर्शक अटकेत

अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणारा चित्रपट दिग्दर्शक अटकेत

Next

पुणे : हातउसने स्वरूपात ६ लाख रुपये ५ टक्के व्याजाने दिले असताना मोबदल्यात ७ लाख ४० हजार रूपये परत करूनही शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन ७ लाख २० हजार रुपयांची खंडणी मागणा-या चित्रपट लेखक-दिग्दर्शकाला खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

शंतनू वसंत पांडे (रा. फ्लॅट नं. ४०१, करन वुडस, मुंबई-बंगळुरू हायवे, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी अवैधरित्या सावकारी व्यवसाय करून सर्वसामान्यांची पिळवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. रविराज रघुनाथ साबळे (रा. फुगेवाडी, दापोडी) यांनी खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडे पांडे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. पांडे याने दिलेली ६ लाख रुपयांची रक्कम मुद्दल आणि व्याजासह त्याला परत केली होती. मात्र पुन्हा पांडे याने शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी आणि कुटुंबाला त्रास देण्याची धमकी देऊन ७ लाख २० हजार रूपयांची मागणी केली. जोपर्यंत तू मला पूर्णपणे पैसे देत नाहीस, तोपर्यंत दररोज २ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. साबळे यांच्या तक्रारीवरून पांडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, भूषण शेलार, मोहन येलपल्ले आणि रूपाली कर्णवर या खंडणीविरोधी पथक २ ने केली आहे.

-------------------------------

Web Title: Film director arrested for illegally lending money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.