‘फिल्मी स्टाइल’ एँट्री, एफटीआयआयमध्ये अनुपम खेर : सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:22 AM2017-10-17T03:22:09+5:302017-10-17T03:53:04+5:30

'Film Style' Entry, Anupam Kher in FTII: Drama of Students in Strong 'Acting' | ‘फिल्मी स्टाइल’ एँट्री, एफटीआयआयमध्ये अनुपम खेर : सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन

‘फिल्मी स्टाइल’ एँट्री, एफटीआयआयमध्ये अनुपम खेर : सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन

Next

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊन काही दिवसच उलटले असताना, अनुपम खेर यांनी प्रशासन आणि विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल अचानक ‘एंट्री’ केली. मेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमवेत लंच करून, संस्थेतील कर्मचाºयांना जवळ घेत ‘तुम्हाला काय वाटतंय मी काम करू शकेन का?’ अशी विचारणा करीत आपल्या सशक्त ‘अभिनया’चे दर्शन सर्वांना घडविले.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो, ते दिवस आजही आठवतात. अजूनही ‘विद्यार्थी’ असल्यासारखेच वाटते. विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यामुळे त्यांचे प्रश्न जाणून घेणे आणि ते सोडविणे महत्त्वाचे आहे. मी खूप सकारात्मक वृत्तीने आज संस्थेमध्ये आलो आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले. एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी सोशल मीडियावरील विविध वक्तव्यांमधून अनुपम खेर चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे ते भाजपाचे प्रवक्तेच असल्यासारखे वाटते, ते हिंदू राष्ट्रवादी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. खेर यांच्या नियुक्तीनंतर सध्या एफटीआयआय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या होणाºया गळचेपीबाबत स्टुडन्ट असोसिएशनने पत्राद्वारे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर खेर यांनी एफटीआयआयला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले. चौहान यांना विद्यार्थ्यांनी केलेला विरोध पाहता अत्यंत सहकार्याच्या आणि मवाळ भूमिकेतून ते विद्यार्थ्यांशी चर्चा करीत होते. दुपारची जेवणाची वेळ असल्याने त्यांनी तडक मेस गाठली आणि विद्यार्थ्यांसमवेत जेवणाचा आनंद लुटला. आज सकाळी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा मास्टर क्लास घेतल्यानंतर, ते पुनश्च स्टुडन्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असल्याचे खेर यांनी स्पष्ट केले.

कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ चा हा मुद्दा माध्यमांनीच काढला आहे. दोन वर्षांनी बघू काय होतंय ते. मी इथे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आलो आहे. विद्यार्थ्यांशी जी चर्चा केली आहे, ती प्रशासन आणि नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्याचा निश्चित
प्रयत्न करीन.
- अनुपम खेर, अध्यक्ष, नियामक मंडळ एफटीआयआय


अनुपम खेर यांनी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी चर्चा केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता ते जे बोलतात ते करून दाखवतात का, हा प्रश्न आहे.
- रोहितकुमार, जनरल सेक्रेटरी, स्टुडन्ट असोसिएशन एफटीआयआय
 

Web Title: 'Film Style' Entry, Anupam Kher in FTII: Drama of Students in Strong 'Acting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.