दिवेकर आणि प्राधिकरण जिमखाना यांच्यात अंतिम लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:40+5:302021-03-07T04:10:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत १४ वर्षांखालील गटात दिवेकर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत १४ वर्षांखालील गटात दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने सलग तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.
निगडीच्या मदनलाल धिंगरा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात रुद्राक्ष वाघमोडेच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने रावेत जिमखाना संघाचा 8 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात वरद रणावरेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने कॅनन क्रिकेट क्लबचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
साखळी फेरी :
रावेत जिमखाना : २१.२ षटकात सर्वबाद ७१ धावा, समर्थ कृष्णा १७, तेजस जगताप १५, रुद्राक्ष वाघमोडे ३-२, पार्थ मिश्रा २-८, अर्चित फटांगरे २-७ पराभूत वि. किरण क्रिकेट अकादमी : ८.२ षटकात २ बाद ७२ धावा, रुद्राक्ष वाघमोडे नाबाद २१, यश कदम २०, संकेत मोसे १-२१ ; सामनावीर - रुद्राक्ष वाघमोडे; किरण क्रिकेट अकादमी संघ ८ गडी राखून विजयी;
दिवेकर क्रिकेट अकादमी : २५ षटकात ७ बाद १७८ धावा, वरद रणावरे ६८, पार्थ ३३, अर्जुन शेडगे २१, वशिता सपकाळ २-१९ वि.वि. कॅनन क्रिकेट क्लब : २५ षटकात सर्वबाद १६१ धावा, प्रणव यादव ५०, अथर्व सिंग २५, कौस्तुभ नाईकवाडी २१, प्रदनील थोरात २०, सम्यक जैन २-२६, आर्यन यादव १-३०, पार्थ सदाडेकर १-३७; सामनावीर - वरद रणावरे; दिवेकर क्रिकेट अकादमी संघ १७ धावांनी विजयी.