अंतिम लढत दिवेकर अकादमी आणि पीवायसी अ यांच्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:37+5:302021-03-07T04:10:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक बारा ...

Final match between Divekar Academy and PYC A. | अंतिम लढत दिवेकर अकादमी आणि पीवायसी अ यांच्यात

अंतिम लढत दिवेकर अकादमी आणि पीवायसी अ यांच्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक बारा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत दिवेकर क्रिकेट अकादमी आणि पीवायसी हिंदू जिमखाना अ या संघांनी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

भूगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात आदीत डोंगरेच्या भेदक गोलंदाजीसह हर्षल पासलकरच्या अर्धशतकाच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाने पीवायसी हिंदू जिमखाना ब संघाचा ९ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आदित्य कापरेची अर्धशतकी खेळी आणि श्रीप्रसाद कुलकर्णीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने द स्पोर्ट्स पार्क संघाचा ७६ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

पीवायसी हिंदू जिमखाना ब : २४.१ षटकात सर्वबाद १२२ धावा, साई बोऱ्हाडे ६७, श्लोक जोशी १३, आदीत डोंगरे ४-२५, हर्षल पासलकर १-२०, यश अधिकारी १-२५, पराभूत वि. पीवायसी हिंदू जिमखाना अ : १३.१ षटकात १ बाद १२४ धावा, हर्षल पासलकर नाबाद ५७, यश अधिकारी नाबाद २७; सामनावीर, आदीत डोंगरे; पीवायसी अ संघ ९ गडी राखून विजयी;

दिवेकर क्रिकेट अकादमी : २५ षटकात ७ बाद १७५ धावा, आदित्य कापरे नाबाद ६५, संतोष चौहान २८, ईश्वरी अवसरे १६, ओमकार रसाळ १२, पुष्कर प्रधान २-२२ वि.वि. द स्पोर्ट्स पार्क : २५ षटकात ५ बाद ९९, विभास मेश्राम १८, अभिनव केंगर १३, श्रीप्रसाद कुलकर्णी ३-१८, आर्यन यादव १-१९, क्षितीज पाटील १-७; सामनावीर - श्रीप्रसाद कुलकर्णी; दिवेकर क्रिकेट अकादमी संघ ७६ धावांनी विजयी.

Web Title: Final match between Divekar Academy and PYC A.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.