पुणे जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:50 PM2022-05-28T13:50:49+5:302022-05-28T14:54:35+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाऊ शकते...
पुणे : जिल्ह्यातील डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या सुमारे ३०३ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या मान्यतेने शुक्रवार (दि. २७) रोजी जाहीर करण्यात आली. यामुळेच आता राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही वेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाऊ शकते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यात १७ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या आहेत. आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी २७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यातील प्रभाग रचना व आरक्षण सोडत रद्द झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
वेल्हा - २८, भोर - ५६, दौंड- ०८, पुरंदर- ०२, बारामती- १५, इंदापूर- ३०, जुन्नर- ५३, आंबेगाव- ३०, खेड - २८, शिरूर- १०, मावळ - १० आणि हवेली १२ ग्रामपंचायती.