अखेर ठरलं! अंतिम वर्षाची परीक्षा १ आॅक्टोबरपासून; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:02 PM2020-09-04T21:02:04+5:302020-09-04T21:02:41+5:30

पुढील आठवड्यात वेळापत्रक होणार जाहीर

Final year examination from 1st October; Decision of Savitribai Phule Pune University | अखेर ठरलं! अंतिम वर्षाची परीक्षा १ आॅक्टोबरपासून; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

अखेर ठरलं! अंतिम वर्षाची परीक्षा १ आॅक्टोबरपासून; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

Next
ठळक मुद्देराज्यातील सर्व विद्यापीठांनी आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी दर्शवली होती सहमती

पुणे : विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून आॅनलाईन पध्दतीने देता येणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक कारणांमुळे आॅनलाईन परीक्षा देता येणार नाहीत, त्यांच्यासाठी आॅफलाईन पध्दतीचा पर्यायही खुला ठेवला जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाकडून परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून १ ते २२ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. 
राज्यातील सर्व विद्यापीठांनी आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक, नियोजन  तसेच आराखडा तयार करण्यासंदर्भात विद्यापिठांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीमध्ये आॅनलाईनसह आॅफलाईन पर्यायही खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. प्रामुख्याने आॅनलाईन परीक्षेवरच भर दिला जाणार आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना लॅपटॉप, इंटरनेट जोडणी, नेटवर्क आदी समस्या येऊ शकतात. या विद्यार्थ्यांचाही बैठकीत विचार करण्यात आला. त्यानुसार या विद्यार्थ्यांना आॅफलाईन पध्दतीने जवळच्या महाविद्यालयात परीक्षा घेण्याच्या निर्णयावर सहमती झाली. 
पुढील आठवड्यात परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाची परीक्षा सुरू होण्यापुर्वी बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक विषयाची परीक्षा बहुपर्यायी ५० गुणांची होणार असून त्यासाठी एक तासांचा वेळ दिला जाणार आहे.
---------------
 विद्यापीठाने तयार केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते ९ आॅक्टोबर दरम्यान तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १० ते २२ आॅक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे.  तसेच १५ आॅक्टोबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.
----------------

Web Title: Final year examination from 1st October; Decision of Savitribai Phule Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.