...अखेर आळंदीला मिळाले मुख्याधिकारी
By admin | Published: April 8, 2016 12:47 AM2016-04-08T00:47:54+5:302016-04-08T00:47:54+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून आळंदी नगरपरिषदेला मुख्याधिकारी नव्हते. खेडचे मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. दरम्यान, संतोष रामचंद्र टेंगले यांची प्रशासकीय कारणास्तव
आळंदी : गेल्या पाच महिन्यांपासून आळंदी नगरपरिषदेला मुख्याधिकारी नव्हते. खेडचे मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. दरम्यान, संतोष रामचंद्र टेंगले यांची प्रशासकीय कारणास्तव आळंदीत बदली करण्यात आली असून, नगर विकास विभागाचे उपसचिव पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.
संतोष टेंगले यांची उमरगा येथून अर्धापूर नगरपरिषदेत जुलैमध्ये बदली झाली होती. मात्र, या बदली आदेशात अंशत: बदल करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने टेंगले यांची मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद या रिक्त पदावर सुधारित पदस्थापना करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. प्रशासकीय कारणास्तव आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करीत आळंदीत रुजू होण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.
येथील मुख्याधिकारी आपल्या मजीर्तील असावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. थेट मुख्यमंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास विभाग, मुख्यमंत्री कार्यालय या ठिकाणी धावदेखील घेतली गेली.
बदलीनंतर नवीन मुख्याधिकारी नियुक्तीस विलंब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आळंदीतील विकासकामाच्या वस्तुस्थितीची छायाचित्रे पाठवून पाठपुरावा करण्यात आला. अनेक दिवस मुख्याधिकारी नियुक्तीचा आदेश प्रलंबित ठेवण्यात आला होता. मात्र, सततच्या पाठपुराव्यास अखेर यश आले.