अखेर १,८१४ कोटी रुपयांत लवासाच्या विक्रीला मंजुरी; मुंबईस्थित कंपनीकडे विकासाचे हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 06:12 AM2023-07-23T06:12:01+5:302023-07-23T06:12:12+5:30

या निर्णयामुळे अडचणीत आलेला हा प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार.

Finally approval for sale of Lavasa for Rs 1,814 crore; Development rights with Mumbai based company | अखेर १,८१४ कोटी रुपयांत लवासाच्या विक्रीला मंजुरी; मुंबईस्थित कंपनीकडे विकासाचे हक्क

अखेर १,८१४ कोटी रुपयांत लवासाच्या विक्रीला मंजुरी; मुंबईस्थित कंपनीकडे विकासाचे हक्क

googlenewsNext

पुणे : मुळशी तालुक्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पाला विकत घेण्याच्या मुंबईस्थित डार्विन ग्रुपच्या प्रस्तावाला अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा  प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अडचणीत आलेला हा प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार असून, हजारो गुंतवणूकदारांना दिलासा  मिळाला आहे. 

काय आहे लवासा प्रकल्प?

राष्ट्रीय कंपनी कायदा  प्राधिकरणाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. मुंबईतील डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप कंपनीने मुळशी तालुक्यातील लवासा सिटी या भारतातील पहिल्या खासगी हिल स्टेशन प्रकल्पाच्या विकासासाठी तयार केलेल्या ठरावाला अंतिम मंजुरी दिली.

दिवाळखोरी संपुष्टात

खंडपीठाचे सदस्य कुलदीप कुमार करीर आणि तांत्रिक सदस्य श्याम बाबू गौतम यांनी हा निर्णय दिला. लवासा कॉर्पोरेशन विरुद्ध २०१८ मध्ये प्रकल्पाच्या ऑपरेशनल क्रेडिटर्सद्वारे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता या निर्णयामुळे ही दिवाळखोरी संपुष्टात आली असून, प्रकल्पाच्या पुढील टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डार्विन कंपनीने २०२१ मध्ये लवासा कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी १ हजार ८१४ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर कमिटी ऑफ क्रेडिटर्सने शिक्कामोर्तब केल्यानंतरही लवासा दिवाळखोरीत असल्याने एनसीएलटीची मंजुरी आवश्यक होती. 

त्यामुळे डार्विन कंपनीला लवासाचा ताबा मिळाला नव्हता. डार्विन कंपनीचा प्रस्ताव नियमांनुसार आवश्यक वैधानिक पूर्तता करत असल्याने त्याला मान्यता देण्यात येत असल्याचे खंडपीठाने दिलेल्या २५ पानी आदेशात म्हटले आहे. 

Web Title: Finally approval for sale of Lavasa for Rs 1,814 crore; Development rights with Mumbai based company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.