अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, शवासन आंदोलनाने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:25 AM2017-11-21T01:25:34+5:302017-11-21T01:25:47+5:30
पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील शेतक-यांनी सुरू केलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनाच्या १९व्या दिवशी शासनाच्या निषेधार्थ आंदोलकांनी शवासन आंदोलन केले.
पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील शेतकºयांनी सुरू केलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनाच्या १९व्या दिवशी शासनाच्या निषेधार्थ आंदोलकांनी शवासन आंदोलन केले. याबरोबरच साखळी उपोषण कायम ठेवले. प्रशासनाने चर्चेची तयारी दर्शविली असून, मंगळवारी आंदोलक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते तथा आंदोलक माऊली शेळके आणि भानुदास शिंदे म्हणाले, सदाभाऊ खोत आणि आमदार राहुल कुल यांनी आंदोलकांशी संवाद साधला तसेच मुख्यमंत्री चर्चेस तयार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता मंत्रालय किंवा सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांची सोमवारी (दि. २०) विठ्ठल मंदिरात सकाळी बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री अशा दोन टप्प्यात होणाºया बैठकीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने चर्चेसाठी शिष्टमंडळाची निवड करण्यात आली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा आणि हा निर्णय गावच्या ग्रामसभेत घेण्यात येणार आहे. शिष्टमंडळ मुंबई येथून माघारी आल्यानंतर चर्चेचा मसुदा ग्रामसभेत मांडून सर्व शेतकºयांबरोबर चर्चा करूनच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. निर्णायक तोडगा जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे, असे शेतकरी आक्रोश कृती समितीचे आंदोलक माऊली शेळके, भानुदास शिंदे, फडके यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे दूध संघाचे संचालक जीवन तांबे उपस्थित होते.
>विमानतळविरोधी संघर्ष समितीचाही पाठिंबा
पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील पारेश्वर मंदिरात विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या वतीने दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकºयांच्या लढ्याला पाठिंबा तसेच विमानतळाचा निषेध करण्यासाठी येथील सात गावांतील शेतकºयांनी एक दिवसाचे उपोषण सोमवारी केले. कानगाव प्रमाणेच विमानतळाचा लढा तीव्र करणार असल्याचे संघर्ष समितीने व्यक्त केले. रोज वेगळवेळे आंदोलने करण्यात येणार आहे.