अखेर मिळाले आरोग्य केंद्र, बाणेरमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:30 AM2018-08-29T02:30:25+5:302018-08-29T02:30:58+5:30
बाणेर येथील हेल्थ केअर सेंटरच्या कामाची पाहणी करताना नगरसेविका ज्योती कळमकर.
पाषाण : स्मार्ट सिटीअंतर्गत भगवती आश्रम डी मार्टजवळ बाणेर येथील फार्मसी हेल्थ केअर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी हे सेंटर उपलब्ध होणार आहे. आज या कामाची पाहणी करताना नगरसेविका ज्योती कळमकर, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर व स्मार्ट सिटीचे अधिकारी बोरसे यांनी केली.
बाणेर परिसरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पहिले आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रात अद्ययावत लॅब, ओपीडी आदी सुविधा देण्यात येणार आहेत. बाणेर बालेवाडी परिसरात एकही सार्वजनिक पालिकेचा दवाखाना नाही. यामुळे येथील नागरिकांना खासगी महागड्या आरोग्य सुविधांवर अवलंबून राहावे लागते. या आरोग्य केंद्रामुळे बाणेर परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे आरोग्य केंद्र लवकर पूर्ण करून हा दवाखाना नागरिकांना सुरू करण्याच्या सूचना नगरसेविका ज्योती कळमकर यांनी दिल्या.