... अखेर माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब; फटाके वाजवत 'राष्ट्रवादी'कडुन जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:12 PM2021-03-31T16:12:52+5:302021-03-31T16:13:18+5:30
मागील ५ महिन्यांपासून सुरू असलेला संभ्रम दूर...
माळेगाव : राज्य शासनाकडून माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायत की नगरपंचायत असा संभ्रम निर्माण झालेल्या माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत नगर विकास सचिवाने तब्बल तीन वेळा नगरपंचायतची उदषोषणा करण्यात आली होती.मात्र निवडणूक आयोगाकडून ठोस निर्णय झाला नसल्याने ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ७७ उमेदवारापैकी ७६ जणांनी सामुहिक अर्ज माघारी घेतल्याने ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकली नाही.त्यामुळे गेली पाच महिने झाले ग्रामपंचायत की नगरपंचायत याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर राज्याच्या नगर विकास उप सचिवांनी राज्यपालांच्या आदेशानुसार माळेगाव ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केल्याचे नोटिसीद्वारे प्रसिद्ध केले. दरम्यान नगरपंचायत बाबत नोटीस जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजहंस चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी माजी सभापती संजय भोसले,माजी सरपंच जयदीप तावरे, आप्पा बनसोडे, दादा जराड, इम्तियाज शेख, निखिल माने, प्रविण जगताप, रणजित माकर, दयावान जराड, प्रितम चव्हाण, युवराज जेधे, पप्पु भोसले, सोनु शेख उपस्थित होते. दरम्यान माळेगाव नगरपंचायतीची अंतिम रचना होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीची कार्य व कर्तव्य पार पाडण्यासाठी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे उपसचिव मोघे यांनी पत्रात नमूद केले आहे.
------------------