...अखेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:10 AM2021-02-14T04:10:45+5:302021-02-14T04:10:45+5:30
शिक्षकांनी केला अधिकाºयांचा सत्कार बारामती : बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) यांनी जानेवारी २०२० मध्ये ...
शिक्षकांनी केला अधिकाºयांचा सत्कार
बारामती : बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट) यांनी जानेवारी २०२० मध्ये गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांचेकडे बारामती तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सेवानोंद पुस्तके अद्ययावत करण्याची लेखी मागणी केली होती. सदर मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी केंद्रवार कॅम्पचे आयोजन करून सेवानोंद पुस्तके अद्ययावत केली.
याबद्दल गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांचेसह त्यांचे कार्यालयीन सहकारी सचिन कवितके, संदीप जाधव, शशिकांत लोणकर, विनोद गायकवाड, मेमाणे यांचा बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सभापती नीता बारवकर व उपसभापती प्रदीप धापटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सभापती बारवकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने ज्ञान द्यावे, असे सांगितले.
उपसभापती धापटे यांनी १५ व्या वित्त आयोगात शाळांच्या भौतिक सुविधांसाठी भरीव तरतूद केली असून त्यासाठी शिक्षकांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन केले. शिक्षक संघाचे पदाधिकारी शिक्षक प्रश्नांसाठी चिकाटीने पाठपुरावा करतात. त्यामुळे शिक्षकांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी कोविड काळात तालुक्यातील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण व व्हिडीओ निर्मितीत उल्लेखनीय काम केलेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सर फाउंडेशनचे तालुका समन्वयकपदी निवड झालेबद्दल सुजाता जाधव, शरद मचाले, सचिन हिलाळ यांचा तर सेवापूर्ती निमित्त ज्ञानदेव होले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड, अध्यक्ष हनुमंत शिंदे, कार्याध्यक्ष बापू कुतवळ, कोषाध्यक्ष बाळासाहेब आवाडे, अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष केशवराव आगवणे, तालुकाध्यक्ष बजरंग जाधव, शिक्षक समितीचे सरचिटणीस सचिन हिलाळ, मा. चेअरमन दिलीप बनकर, रवींद्र तावरे, शिवाजी लडकत, बाळासाहेब नरुटे, सोमनाथ चौगुले, स्मिता गायकवाड, संचालक विजय लव्हे, शरद मचाले, शरद भोई, राज्य कार्यकारिणी सदस्त अविनाश भोसले, सल्लागार उत्तम जगताप, नानासो चौलंग, धनपाल माने यांचेसह शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन संपर्कप्रमुख रेवननाथ परकाळे व आभार प्रसिद्धीप्रमुख गणेश कुंभार यांनी मानले.
फोटो
१२ बारामती २०