...अखेर बारामती तालुक्यातील शिरसाई उपसामधून पाण्याचे आवर्तन सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 02:35 PM2021-05-26T14:35:17+5:302021-05-26T14:35:35+5:30

पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.

... Finally released water from Shirsai in Baramati taluka; relief to the farmers | ...अखेर बारामती तालुक्यातील शिरसाई उपसामधून पाण्याचे आवर्तन सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

...अखेर बारामती तालुक्यातील शिरसाई उपसामधून पाण्याचे आवर्तन सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

googlenewsNext

 उंडवडी कडेपठार : अखेर शिरसाई उपसा सिंचन योजनेतून ६ पंपाद्वारे मंगळवारी (दि. २५) आवर्तन सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुरवातीला उंडवडी कडेपठार ग्रामपंचायतीचे सरपंच भरत बनकर,उपसरपंच भुषण जराड यांनी आवर्तन सुरु होण्यासाठी पत्रव्यवहार करुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सरपंच,उपसरपंच यांनी सांगितले.

शिर्सुफळ तलावातून डाव्या कालवा व उजव्या कालवा अशा दोन कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून आठ-दहा दिवस पाणी चालू असणार आहे.डाव्या कालव्याला ३ पंपांद्वारे व उजव्या कालव्याला ३ पंपाद्वारे पाणी सोडण्यात आले.उजव्या कालव्यातून  सोनवडी,जळगाव,अंजनगाव,कारखेल तर डाव्या कालव्यातून उंडवडी
कडेपठार,जराडवाडी,गोजुबावी,ब-हाणपुर,उंडवडी सुपे या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.जिरायती भागात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता.डिसेंबरनंतर रब्बी हंगामात बागायत क्षेत्रात वाढ होऊन पीक रचना बदलली.त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.यामुळे सध्या पाण्याअभावी भूईमुग,मका,कडबा इतर पिके जळुन जाण्याच्या मार्गावर होती.त्याचबरोबर ग्रामस्थांनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शिरसाईचे आर्वतन सुरु झाल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाभार्थी क्षेत्रातील बळीराजाला २२,५०० रुपये पर एम.सी.एफ.टी. दराने ५० टक्केहून अधिक प्रमाणात पाणी मिळणार आहे.मागील थकीत पाणीकराच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे.

तसेच चालू पाण्याची १०० टक्के रक्कम भरल्यावरच पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेला ७ नंबरचा फॉर्म भरुन पाण्याची मागणी करुन सहकार्य करावे,अशी विनंती पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल शिंदे यांनी केली आहे.
-----------------

Web Title: ... Finally released water from Shirsai in Baramati taluka; relief to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.