अखेर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू, आजपासून आॅनलाइन अर्ज, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:14 AM2018-02-10T01:14:46+5:302018-02-10T01:16:27+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी शनिवापासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी शनिवापासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. लॉटरी पद्धतीने प्रवेशाची पहिली यादी जाहीर करणे, प्रवेश घेणे व प्रवेशाच्या पुढील फेºया आदींचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
आरटीईअंतर्गत गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमधील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहेत. या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाते. विद्यार्थ्यांच्या पालकांना ६६६.२३४ीिल्ल३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे, असे प्राथमिक विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
दरवर्षी आरटीई प्रवेशासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी यंदा जानेवारीपासूनच ही प्रक्रिया राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळांनी आरटीई अंतर्गत नाव नोंदणी करण्यास टाळाटाळ केल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. आरटीई प्रवेशाच्या ३ फेºयांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले होते, मात्र त्यामध्ये आता बदल झाला आहे.
पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी पालकांना १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करता येईल. त्यानंतर लॉटरी पद्धतीने प्रवेशाची यादी जाहीर केली जाईल. पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर उर्वरित जागांच्या प्रवेशासाठी पुढील फेºयांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे अशी माहिती गोसावी यांनी दिली.
शाळांनी नोंदणी करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली असतानाही खूप कमी शाळांनी नोंदणी केली होती. अखेर शिक्षण विभागाने शाळांची नोंदणी करून घेतली आहे. त्यामुळे राज्यातील ९ हजार १०० शाळांमधील १ लाख ३५ हजार प्रवेशाच्या जागा झाल्या आहेत.