अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:49+5:302021-09-25T04:10:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पालकांसह संस्थाचालकांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

Finally, the school will start from October 4 | अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार

अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पालकांसह संस्थाचालकांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फाेर्ससोबत चर्चा करून अखेर येत्या ४ ऑक्टोबरपासून इयत्ता पहिलीपासून सर्व वर्गांच्या शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वतीने स्वतंत्र व सविस्तर आदेश काढण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील माहिती दिली. पवार यांनी सांगितले की, गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या कशी राहणार, याबाबत येत्या १ ऑक्टोबरला आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यात एक कोटी लोकांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याबाबत प्रशासन करत असलेल्या कामाबाबत आमदार - खासदारांनी समाधान व्यक्त केले आहे. तिसऱ्या लाटेचीदेखील प्रशासनाची तयारी सुरू आहे.

-----

लसवंतांसाठी स्वीमिंग पूल खुले होणार

सध्या खेळाडूंसाठी सार्वजनिक स्वीमिंग पूल सुरू केले आहेत. यापुढे कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वच नागरिकांसाठी स्वीमिंग पूल खुले करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

------

दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्राला पत्र

पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना लसीकरण चांगल्या प्रकारे सुरू आहे. परंतु सध्या पहिला डोस घेतल्यानंतर तब्बल ८४ दिवस थांबावे लागते. त्याशिवाय पुढील डोससाठी नोंदणीच होत नाही. आता लस उपलब्ध होत असल्याने राज्य शासनाच्या वतीने केंद्राला पत्र पाठवून दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

-------

विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने आता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच लसीकरणदेखील चांगले झाले आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग खूपच कमी झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुधारावी, यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. यामुळेच यापुढे विनामास्क फिरणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना पुणे, पिंपरी - चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांना देण्यात आल्या असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Finally, the school will start from October 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.