अखेर पुण्यासाठी ॲंटिजन किटचा पुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:39+5:302021-05-19T04:12:39+5:30
पुणे : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पुणे जिल्ह्यात ॲंटिजन किटचा तुटवडा होता. परंतु, मंगळवार (दि.18) पासून जिल्ह्यासाठी ॲंटिजन किटचा पुरवठा ...
पुणे : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पुणे जिल्ह्यात ॲंटिजन किटचा तुटवडा होता. परंतु, मंगळवार (दि.18) पासून जिल्ह्यासाठी ॲंटिजन किटचा पुरवठा सुरू झाला असून, हाफकिनला पुणे जिल्हा प्रशासनाने 2 लाख 38 हजार ॲंटिजन किटची ऑर्डर दिली आहे. यापैकी पहिली ऑर्डर 10 हजार 500 किट उपलब्ध झाले आहेत. यामुळे आता हाॅटस्पाॅट आणि रेड अलर्ट गावांमध्ये पुन्हा एखदा कोरोना चाचण्या सुरू होणार आहे.
पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्ससह ॲंटिजन किटचा तुटवडा निर्माण झाला. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. परंतु हाॅटस्पाॅट व रेड अलर्ट गावांमध्ये जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी ॲंटिजन किटची गरज होती. अखेर पुण्यासाठी हा पुरवठा सुरू झाला आहे. पुण्यासाठी 2 लाख 38 हजार ॲंटिजन किटची ऑर्डर देण्यात आली. मंगळवारी राज्यासाठी 75 हजार ॲंटिजन किटस उपलब्ध झाले. त्यापैकी पुण्यासाठी 10 हजार 500 किट्स मिळाले.
-------
ॲंटिजन किट्सची किंमत वाढता वाढे
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ॲंटिजन किटचीची किंमत केवळ पाच ते सात रुपये होती. मागणी वाढल्यानंतर दरदेखील वाढत गेले. गतवर्षी ऑगस्ट, नोव्हेंबर महिन्यात हे दर 29 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत वाढत गेले. आता तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे दर 123 रुपये एवढे झाले. दरवाढी सोबतच किटचा तुटवडा निर्माण झाला. अखेर पुणे जिल्हा प्रशासनाने 89 रुपये किट दराने हाफकिन इन्स्टिट्यूटला 2 लाख 38 हजार किटची ऑर्डर दिली आहे.