...अखेर टाकळी हाजीला पाणी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:10+5:302021-07-01T04:09:10+5:30
वीज वितरण कंपनीने सध्या विजेच्या बिलाच्या वसुलीसाठी मोहीम सुरू केल्याने थकबाकी असलेल्या घरगुती ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठा योजनेच्या बिले वसुलीसाठीही ...
वीज वितरण कंपनीने सध्या विजेच्या बिलाच्या वसुलीसाठी मोहीम सुरू केल्याने थकबाकी असलेल्या घरगुती ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठा योजनेच्या बिले वसुलीसाठीही तगादा लावला आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने अनेक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची वीज बंद करण्यात आल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टाकळी हाजी हे मोठ गाव असून गावच्या पाणीपुरवठा योजनेचे बिल थकल्याने गेल्या सहा दिवसांपूर्वी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ तसेच ग्रामस्थांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांची भेट घेतली. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. कार्यकारी अभियंता येडके यांनी तत्काळ सूचना दिल्यानंतर सहायक अभियंता बाळासाहेब टेंगले यांनी वीज सुरू केल्याने पाणीपुरवठा योजना सुरू झाली असून, सहा दिवसांनंतर गावात पाणी आल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडीभाऊ जाधव यांनी सांगितले.