Pune Metro: अखेर मध्यवर्ती भागातून जाणारी भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 03:12 PM2024-09-29T15:12:02+5:302024-09-29T15:12:19+5:30
पुणेकर अनेक दिवसांपासून या भूमिगत मेट्रोच्या प्रतीक्षेत असून अखेर ती सुरु झाल्याने नागरिक प्रवासासाठी सज्ज झाले आहेत
पुणे: जिल्हाधिकारी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गातून जाणारी मेट्रो अखेर पुणेकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन व स्वारगेट ते कात्रज (टप्पा-1) विस्ताराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ही मेट्रो सुरु झाल्याने मध्यवर्ती भागातील ट्राफिक कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पुणेकर अनेक दिवसांपासून या भूमिगत मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. अखेर ती सुरु झाल्याने नागरिक प्रवासासाठी सज्ज झाले आहेत
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गातून जाणाऱ्या मेट्रोचे तिकीट दरही मेट्रो प्रशासनाने जाहीर केले आहेत. या भूमिगत मार्गात चार स्थानके असणार आहेत. जिल्हा न्यायालपासून मेट्रो सुरु झाल्यावर ती कसबा पेठ मेट्रो स्थानक- मंडई मेट्रो स्थानक यामार्गे स्वारगेटला जाणार आहे. जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ स्थानकाला नागरिकांना १० रुपये मोजावे लागणार आहेत. तर जिल्हा न्यायालय ते मंडई आणि स्वारगेट या दोन्ही ठिकणी जाण्यासाठी १५ रुपये आकारण्यात आले आहेत. त्याप्रमाणेच स्वारगेट ते मंडई स्थानकापर्यंत जाण्यासाठी १० रुपये मोजावे लागणार आहेत. तर स्वारगेटपासून कसबा पेठ आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांसाठी १५ रुपये आकारण्यात आले आहेत.
दुपारी ४ नंतर मेट्रो सुरु सुरु
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यावर दुपारी ४ च्या सुमारास मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे.