Baramati| ...अखेर बारामतीत रेल्वेच्या जागेतील सेवा रस्त्याचे काम होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 06:41 PM2023-07-29T18:41:54+5:302023-07-29T18:44:19+5:30

बारामती नगर परिषदेचे माजी गटनेते सचिन सातव यांनी माहिती दिली....

Finally the work of the service road in the railway area will start in Baramati | Baramati| ...अखेर बारामतीत रेल्वेच्या जागेतील सेवा रस्त्याचे काम होणार सुरू

Baramati| ...अखेर बारामतीत रेल्वेच्या जागेतील सेवा रस्त्याचे काम होणार सुरू

googlenewsNext

बारामती : अखेर बारामती नगर परिषद आणि रेल्वेचे सेवा रस्त्याच्या जागेवरून सुरू असणारे ‘तू तू मैं मैं’आता थांबले आहे. सार्वजनिक कामांसाठी रेल्वे मंत्रालयाने नमते घेत धोरण बदलले आहे. त्यासाठी आवश्यक असणारा जागेचा दर सहा टक्क्यांवरून थेट दीड टक्क्यांवर आणला. ती रक्कम रेल्वेकडे बारामती नगर परिषदेने भरणा केल्यानंतर रविवारी (दि. ३०) सेवा रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

त्याबाबत बारामती नगर परिषदेचे माजी गटनेते सचिन सातव यांनी माहिती दिली. रेल्वेने सुरुवातीला नगर परिषदेकडे मालमत्ता, इमारती रेल्वे जागेसह सात कोटी ३२ लाखांची मागणी केली होती. वाहनांची सोय, शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्व्हिस रस्ता महत्त्वाचा आहे. अनेकांनी सेवा रस्त्यासाठी मोक्याची जागा तत्काळ दिली होती. त्यामुळे मात्र, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही मागणी कदापि मान्य नव्हती. आम्ही सुरू केलेले सेवा रस्त्याचे काम रेल्वे प्रशासनाने बंद पाडल्यानंतर अखेर आम्ही आक्रमक भूमिका घेतली. आमचे काम बंद केल्यानंतर रेल्वेच्या मालधक्क्यावरून येणारे ट्रक आम्ही अडविले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि ‘डीआरएम’ यांच्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर रेल्वने याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विभागापासून दिल्लीपर्यंत बैठका झाल्या. दिल्लीत झालेल्या चर्चेत त्यावेळी रेल्वे प्रशासन रस्त्यासाठी जागेचा सहा टक्के दर असल्याचे पुढे आले. तो आपल्याला परवडणारा नव्हता. त्यामुळे ‘अजितदादां’नी खासदार सुळे यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा केली. आम्हीदेखील दिल्लीला जात भेट घेतली. त्यानंतर केंद्राने त्यांच्या खास केंद्र पातळीवरील बैठकीत रेल्वेच्या जागेचा सार्वजनिक कामांसाठीचा सहा टक्के दर हा दीड टक्क्यांवर आणण्यात आला.

२१ एप्रिल २०२३ ला प्रस्ताव दाखल केला. मात्र, रेल्वेने नगर परिषद प्रशासनाचा प्रस्ताव नाकारत जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच प्रस्ताव स्वीकारण्याची भूमिका घेतली. त्यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मदतीची भूमिका घेतली, त्यांनी तो प्रस्ताव पाठविला. विविध महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर रेल्वेची एक कोटी ३१ हजार ४४१ रुपयांची डिमांड नोट आली. अजितदादांनी ही रक्कम तातडीने भरण्याची सूचना केली. नगर परिषद प्रशासनाने एक कोटी ३१ लाख ४४० रुपये रक्कम शुक्रवारी (दि. २८) तातडीने भरणा केली. रेल्वे विभाग, उपमुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बारामती नगर परिषद कार्यालयाच्या तत्परतेने जागेचा विषय एका दिवसांत ऐतिहासिक असा मार्गी लागला आहे. रेल्वेची सेवा रस्त्यासाठी ३५ वर्षांसाठी जागा मिळाली आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर लवकरच अजितदादांच्या संकल्पनेतील सिटी सेेंटर चौक अस्तित्वात येणार असल्याचे माजी गटनेते सातव यांनी सांगितले. यावेळी गणेश सोनवणे, अविनाश बांदल, मंगेश ओमासे, तुषार लोखंडे, सचिन मत्रे, अंकित पवार आदी उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाने सेवा रस्त्याला जागा हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या हद्दीतील वेगवेगळी बांधकामे शिफ्टींग चार्जेस, जागेसह सात कोटी ३२ लाखांची मागणी केली होती. मात्र, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे रेल्वेने केंद्र पातळीवर बैठक घेत सहा टक्क्यांच्या जागेसाठीचा दर दीड टक्क्यांवर आणला. त्यानंतर ही रक्कम एक कोटी ३१ लाख ६८ हजार ४४१ रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे बारामती नगर परिषदेची कोट्यवधींची बचत झाली.

- सचिन सातव, माजी गटनेते बारामती नगर परिषद

 

Web Title: Finally the work of the service road in the railway area will start in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.