....अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:24+5:302021-04-14T04:10:24+5:30
गेल्या महिन्यात वढू बुद्रुक हद्दीत झकनाईच्या मळ्यात अचानक केलेल्या बिबट्याशी झुंज देत मनीष शिवले या शेतकऱ्याने कशीबशी आपली सुटका ...
गेल्या महिन्यात वढू बुद्रुक हद्दीत झकनाईच्या मळ्यात अचानक केलेल्या बिबट्याशी झुंज देत मनीष शिवले या शेतकऱ्याने कशीबशी आपली सुटका करवून घेत प्राण वाचवले होते. तर त्यानंतर पिंपळे जगताप रस्त्याजवळ दुचाकीवरील सचिन शिवले या तरुणालाही रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. या दरम्यान अनेक वेळा शेतात बिबट्यांचे दर्शन व पाळीव प्राण्यांवरही हल्ले सुरूच असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे बिबट्याला पकडण्याची शेतकरी वर्गाची आग्रही मागणी होती.
त्यानुसार वनविभागाने तातडीने दोन्ही घटनेच्या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. दरम्यान आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे लोकांचा निदर्शनात आले. हा बिबट्या दोन ते अडीच वर्षे वयाचा असून त्याला माणिकडोह येथील केंद्रात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती
दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला असून या कामी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, सरपंच अनिल शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, कृष्णा आरगडे, माऊली भंडारे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, शंकरराव शिवले, राहुल कुंभार व ग्रामस्थ आदींनी सातत्याने पाठपुरावा केला.
पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या