अखेर शिक्रापुरातील वेळ नदीला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:01+5:302021-05-13T04:11:01+5:30

गेल्या काही दिवसांपासून आमदार ॲड. अशोक पवार यांच्याकडे घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक अरुण करंजे त्याचबरोबर शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच ...

Finally water in Shikrapur time river | अखेर शिक्रापुरातील वेळ नदीला पाणी

अखेर शिक्रापुरातील वेळ नदीला पाणी

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून आमदार ॲड. अशोक पवार यांच्याकडे घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक अरुण करंजे त्याचबरोबर शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, मयूर करंजे, रमेश थोरात, सोमनाथ भुजबळ यांनी संबंधित पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार व निवेदने देऊन वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी केलेली होती. तर जातेगावचे माजी सरपंच व चासकमान पाणी संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, आमदार अशोक पवार यांनी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांचा बेशिस्त कारभार थांबवण्याच्या सूचना करत पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुखई येथील पाटातून रात्री नऊ वाजता पाणी सोडण्यात आले. दरम्यान शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या व सर्व गावकऱ्यांच्या मागणीमुळे पाटबंधारे विभागाकडून वेळ नदीला पाणी सोडण्यात आले असून, येथील पाणीप्रश्न काहीसा मार्गी लागणार असून यावर दरवर्षी उन्हाळ्यात येणाऱ्या या अडचणींवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी उपसरपंच सुभाष खैरे यांनी केली आहे.

--

१२ शिक्रापूर वेळ नदी

१२ शिक्रापूर फोटो : शिक्रापूर येथून वाहणाऱ्या वेळ नदीत सोडण्यात आलेले पाणी.

Web Title: Finally water in Shikrapur time river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.