वित्त आयोगाचा निधी आरोग्य सुविधांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:14+5:302021-06-01T04:09:14+5:30

नारायणगाव : वित्त आयोगाच्या निधीतून अनेक ग्रामपंचायतींनी रुग्णवाहिका घेतल्या. परंतु, चालकाअभावी त्या धूळखात पडून असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले ...

Finance Commission funds for health facilities | वित्त आयोगाचा निधी आरोग्य सुविधांसाठी

वित्त आयोगाचा निधी आरोग्य सुविधांसाठी

Next

नारायणगाव : वित्त आयोगाच्या निधीतून अनेक ग्रामपंचायतींनी रुग्णवाहिका घेतल्या. परंतु, चालकाअभावी त्या धूळखात पडून असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींपैकी ९० ग्रामपंचायतींनी एकत्रित येऊन वित्त आयोगाचा निधी आरोग्य सुविधांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सव्वादोन कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असून, या निधीचा आरोग्य सुविधांसाठी वापर करण्याचा निर्णय घेणारा जुन्नर तालुका राज्यातील एकमेव तालुका ठरला आहे.

नारायणगाव येथे या ९० ग्रामपंचायतींतील सरपंचांची बैठक पार पडली. या वेळी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर , उपसरपंच माया डोंगरे, कांदळीचे सरपंच विक्रम भोर, शिरोली बुद्रुकचे सरपंच प्रदीप थोरवे, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, टिकेकरवाडीचे सरपंच संतोष टिकेकर, खिलारवाडचे सरपंच दिलीप खिल्लारी, वडज सरपंच सुनील चव्हाण, गुंजाळवाडीचे सरपंच रमेश ढवळे, आर्वी सरपंच रेश्मा वायकर, आहीनवेवाडी सरपंच सीमाताई खंडागळे, मांदारने सरपंच सविता ठोसर, सरपंच वंदना गाढवे, सपना दांगट आदी उपस्थित होते.

सरपंच योगेश पाटे, राजेंद्र मेहेर, विक्रम भोर, प्रदीप थोरवे, महेश शेळके, संतोष टिकेकर यांनी १५ व्या वित्त आयोगासंदर्भातील निधीची माहिती देऊन या निधीचा उपयोग जुन्नर तालुक्यातील आरोग्य सुविधासाठी करण्याचा मनोदय व्यक्त केला. ९० ग्रामपंचायतींनी वित्त आयोगाचा निधी आरोग्य सुविधांसाठी वापरण्याचे सहमती दर्शवणारे लेखी पत्र जुन्नर तालुका सरपंच परिषद यांच्याकडे दिलेले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या सहकार्यातून पुढील चार टप्प्यांत जास्तीत जास्त निधीद्वारे जुन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनोदय या वेळी उपस्थित सरपंचांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेकडे पाठवणार प्रस्ताव

१५ व्या वित्त आयोगाचे पहिल्या टप्प्यातील सव्वादोन कोटी रुपये उपलब्ध होणार आहे. या रकमेतून सीटी स्कॅन, ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व सरपंचांना विश्वासात घेऊन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत चाचण्या करण्यात येणार आहे. तसेच लसीकरण वाढवण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे उपस्थित सरपंचांनी सांगितले.

३१नारायणगाव

जुन्नर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तालुक्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेताना वारूळवाडी येथे उपस्थित विविध गावाचे सरपंच .

===Photopath===

310521\31pun_8_31052021_6.jpg

===Caption===

३१नारायणगाव   जुन्नर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेताना वारूळवाडी येथे उपस्थित विविध गावाचे सरपंच .

Web Title: Finance Commission funds for health facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.