हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली महिलांकडून अर्वाच्च शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 03:20 PM2019-10-10T15:20:31+5:302019-10-10T15:37:39+5:30

वाकडेवाडी येथील मुथुट फायनान्स कंपनीतून २ वर्षांपूर्वी फिर्यादीने १४ लाख रुपये कर्ज घेतले आहे़...

Finance companies employee girl recover very bad quarrel | हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली महिलांकडून अर्वाच्च शिवीगाळ

हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली महिलांकडून अर्वाच्च शिवीगाळ

Next

पुणे : गेली दोन वर्षांपासून नियमित कर्जफेड करत असताना केवळ एक हप्ता थकल्याने एका नागरिकाला मुथुट फायनान्स कंपनीतील वसुली महिलांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे़. 
याप्रकरणी प्रभाकर कुतवळ यांनी मुथुट फायनान्स कंपनीच्या या महिलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली होती़. त्यांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे़. याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. के़ . व्यंकटेशम यांच्याकडे ही कैफियत मांडल्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले़. 
प्रभाकर कुतवळ यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी वाकडेवाडी येथील मुथुट फायनान्स कंपनीतून २ वर्षांपूर्वी १४ लाख रुपये कर्ज घेतले आहे़. आतापर्यंत ते नियमितपणे कर्जाचे हप्ते वेळेवर भरत होते़. सप्टेंबर महिन्याचा त्यांचा हप्ता थकला होता़. त्यांना फायनान्स कंपनीतून फोन करुन तेथील महिलांनी वाईट  शिवीगाळ केली़ व तुझ्याकडे बघुनच घेतो, अशी धमकी त्यांना दिली़.
त्यांना आलेल्या फोनवरुन झालेल्या संभाषणातून त्यांचा १० सप्टेंबरचा हप्ता थकल्याचे सांगण्यात येते़. त्यानंतर हप्ता का भरला नाही़ अशी विचारणा केल्यावर ते माझा चेक मिळाला नाही़, सोमवारपर्यंत चेक मिळाला की हप्ता भरतो़, त्यावर कंपनीतून बोलणारी महिला त्यांना अर्वाच्य भाषेत झापायला सुरुवात करते़, 
तुम्ही महिनाभर झोपले होते का? लायकी आहे का तुमची असे म्हटल्यावर कुतवळ हे नीट बोला असे म्हणतात़... त्यावर ही महिला तुम्ही कोण लागून गेले़ आम्ही जहागिरदार आहोत, म्हणूनच तुम्हाला लोन देतो़ लायकी नाही म्हणून भीक मागायला कशाला येतात़, खिशात पैसे नाही तर घर कशाला घेता़, आम्हाला पैसे कसे वसुल करायचे माहिती आहे़.. तुमच्या गॅरेंटरला पहा आता कसे करतो़, कंपनी लोन देते ना तसे वसुलही करते़. त्यानंतर तर त्या महिलेने कहरच केला़. तुझ्या बायकोला पाठव, असे म्हणून त्यांना मानहानीकारक धमकी दिली़.. 

Web Title: Finance companies employee girl recover very bad quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.