विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:38+5:302021-06-25T04:08:38+5:30
जयहिंद शैक्षणिक संकुलाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. सुभाष आंद्रे यांना आर्थिक परिस्थितीमुळे दिव्याला शिक्षण घेता येत नसल्याचे समजले असता त्यांनी ...
जयहिंद शैक्षणिक संकुलाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. सुभाष आंद्रे यांना आर्थिक परिस्थितीमुळे दिव्याला शिक्षण घेता येत नसल्याचे समजले असता त्यांनी दिव्याच्या घरी संपर्क करून विचारपूस केली आणि पुढील शिक्षणासाठी कुंदन पवार यांनी २५ हजारांची आर्थिक मदत केली. कुंदन पवार हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तयार असतात असे जनसंपर्क अधिकारी प्रा. सुभाष आंद्रे यांनी सांगितले. सदर रकमेचा धनादेश देण्यासाठी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. रतिलाल बाबेल, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. सुभाष आंद्रे हे उपस्थित होते.
या वेळी जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ म्हणाले की, कुंदन पवार यांच्यासारख्या समाजातील दानशूर व्यक्तींनी या कोरोना महामारीच्या काळात संकटात असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आणीबाणीच्या काळातही संस्था विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील असेही आश्वासन जितेंद्र गुंजाळ यांनी दिले.
२४ नारायणगाव
कुंदन पवार यांची जयहिंद कॉलेजच्या दिव्या मुळे या विद्यार्थिनीला आर्थिक मदत दिली.