आंबेगाव शिक्षक पतसंस्थेकडून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:53+5:302021-07-02T04:08:53+5:30

आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे दिवंगत सभासद साधना सुभाष जैद यांचे वारस सुभाष भागूजी जैद यांना ...

Financial assistance from Ambegaon Shikshak Patsanstha | आंबेगाव शिक्षक पतसंस्थेकडून आर्थिक मदत

आंबेगाव शिक्षक पतसंस्थेकडून आर्थिक मदत

googlenewsNext

आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे दिवंगत सभासद साधना सुभाष जैद यांचे वारस सुभाष भागूजी जैद यांना संस्थेचे सभापती राजाराम काथेर यांचे हस्ते सभासद कल्याण निधी योजनेतून १५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

संस्थेच्या मुख्य कार्यालयात मासिक सभेच्या दिवशी धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी जिल्हा वसतिगृह उपाध्यक्ष नंदकुमार श्रीरंग चासकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय सोपानराव वळसे पाटील, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, शिक्षक नेते विजय घिसे, उपसभापती चिमा रामा बेंढारी, खजिनदार संजीव काळूराम ढोंगे, मानद सचिव बाळासाहेब पांडुरंग राऊत, संचालक संतोष सुदाम गाढवे, महेश बापू शिंदे, रवींद्र गीताभाऊ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

मासिक सभेमध्ये सभासदांच्या हितासाठी कर्जावरील व्याजदर ९.६० टक्केवरून ८.४० टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सभासदांस वेतन मर्यादेनुसार ३५ लाख रुपयांपर्यंत सर्वसाधारण व ६० हजार रुपयांपर्यंत आकस्मिक कर्जवाटप केले जाते. तसेच सर्व ठेवींवरील व्याजदरामध्ये बदल करण्यात आले. संस्था सभासद कल्याण निधी योजनेतून एखाद्या सभासदाचे आकस्मित निधन झाल्यास त्याचे वारसास १५ लाख रुपये आर्थिक मदत करत असून, सभासदाचा वैद्यकीय उपचारासाठी ४० हजार व अपघात झाल्यास २० हजार रुपये मदत करत असल्याचे सभापती राजाराम काथेर यांनी सांगितले.

Web Title: Financial assistance from Ambegaon Shikshak Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.