गलांडवाडी येथील अनाथालयास आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:30+5:302021-03-13T04:17:30+5:30
पुण्यातील ज्ञानेश्वरी महिला पतसंस्था या संस्थेद्वारे संस्थेला महिला दिनानिमित्त खाऊवाटप तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप केले. खाडे बालकाश्रमात सुमारे २५ ...
पुण्यातील ज्ञानेश्वरी महिला पतसंस्था या संस्थेद्वारे संस्थेला महिला दिनानिमित्त खाऊवाटप तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप केले.
खाडे बालकाश्रमात सुमारे २५ निराधार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांचा पूर्ण खर्च खंडेराव खाडे व प्रमिला खाडे हे दोन दांपत्य गेली २२ वर्षे करीत आहेत. यातून अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडले देखील आहेत. या संस्थेला भेट देण्याकरता चिंचवडहून माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, नवनाथ सरडे, राहुल वाघुले मान्यवर आले होते. संस्थेचे सर्व कार्य पाहिल्यानंतर त्यांनी संस्थापक, अध्यक्षा व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या वेळी संस्थेचे अधीक्षक बापू गोफने व बापू बडे उपस्थित होते. पुण्यातील ज्ञानेश्वरी महिला पतसंस्था या संस्थेद्वारे संस्थेला महिला दिनानिमित्त खाऊवाटप तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच या वेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रमिला खाडे, उपाध्यक्षा सुरेखा चव्हाण, सचिव प्रतिभा मोहिते आदी उपस्थित होते.