दत्तात्रय भरणे यांच्याकडून स्वप्नील लोणकरच्या कुटुबियांना १ लाखांची आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:27 PM2021-07-18T20:27:09+5:302021-07-18T20:27:16+5:30
स्वप्निलच्या वडीलांना प्रिंटिग व्यवसायासाठी मदत करण्याचे दिले आश्वासन
फुरसुंगी: फुरसुंगी येथील स्वप्निल लोणकर कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन जलसंपदा राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी त्यांच्या भरणे कुटुबियांच्या वतीने १ लाख रुपयांची रोख मदत केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेला व नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणानं आत्महत्या केली होती. आज दुपारी यांनी लोणकर कुटुंबियांची सांत्वनपर त्यांनी भेट घेतली.
यावेळी स्वप्निलचे वडील म्हणाले, आम्ही अजून तीन चार महिने वाट पाहणार नाही तर आम्ही तिघेही जीवन संपवणार असे सांगितले. आम्हाला मदत मिळत नाही. ठामपणे कोणी काही सांगत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्राने होणारा अधिकारी गमावला आहे. त्याला तुकाराम मुंढे सारखा अधिकारी होयचे होते. अन्य विद्यार्थ्यानां नोकरी मिळाल्यास स्वप्निल याला श्रदांजली ठरेल.
स्वप्निलच्या वडीलांचा प्रिंटिगचा व्यवसाय आहे. त्यासाठी व्यवसायासाठी कशी मदत करता येईल, ते पाहतो, उद्या पंढरपुर येथे मुख्यमंत्री भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करु. असे आश्वासन भरणे यांनी लोणकर कुटुंबियाना दिले.