विद्यापीठाच्या पतसंस्थेत आर्थिक अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:10 AM2021-04-11T04:10:01+5:302021-04-11T04:10:01+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पतसंस्थेवर विद्यापीठातील कर्मचा-यांच्यामधून काही व्यक्ती संचालक मंडळावर निवडून जातात. त्यातील संतोष मदने यांनी संचालक पदाचा ...

Financial irregularities in the credit union of the university | विद्यापीठाच्या पतसंस्थेत आर्थिक अनियमितता

विद्यापीठाच्या पतसंस्थेत आर्थिक अनियमितता

googlenewsNext

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पतसंस्थेवर विद्यापीठातील कर्मचा-यांच्यामधून काही व्यक्ती संचालक मंडळावर निवडून जातात. त्यातील संतोष मदने यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव हे पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामुळे मदने यांनी संचालक पदाचा राजीनामा कुलसचिवांकडे दिला. मात्र एक महिन्यानंतरही याबाबत चौकशी करण्यात आली नाही.

पतसंस्थेचे २०१९ - २०२० या वर्षीचे लेखा परीक्षण अद्याप झाले नाही. पतसंस्थेचे सर्व व्यवहार नियमित व्हावेत ,अशी मागणी संचालक मंडळाच्या सभेत करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही कर्मचा-यांनी कर्जाचे हफ्ते भरलेले असताना त्यांच्या नावे मोठी रक्कम दिसत आहे,असे मदने यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यापीठाच्या या पतसंस्थेतील धनादेश नोकर भरती घोटाळ्यात वापरण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रांमध्ये बोगस नोकर भरती करण्यात आली असल्याचे समोर आले होते. यासंदर्भात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचे धागेदोरे पतसंस्थेपर्यंत येऊन पोहोचले होते. त्यामुळे पतसंस्थेत आर्थिक अनियमितता होत असल्याचा प्रकार विद्यापीठासाठी नवीन नाही. परंतु, नेहमीच अशा घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे एका संचालकांने सर्व कारभार नियमित व्हावा म्हणून राजीनामा दिल्यानंतर तरी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Financial irregularities in the credit union of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.